On This Day: पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली, महात्मा गांधींनी नवजीवन वृत्तपत्र सुरू केले, जाणून घ्या महत्वाच्या घडामोडी

7 October in History: आजच्या दिवशी कोणत्या खास घडामोडी घडल्या हे एका क्लिकवर जाणून घेऊया.
On This Day: पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली, महात्मा गांधींनी नवजीवन वृत्तपत्र सुरू केले, जाणून घ्या महत्वाच्या घडामोडी
Updated on

7 October in History: आजच्या दिवशी आजच्या दिवशी पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली होती. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयन्त होता. तसेच आजच्या दिवशी कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडल्या हे सविस्तरपणे जाणून घेऊया.

२००८: लघुग्रह २००८ TC3 - ही उल्का पृथ्वीवर सुदान प्रदेशात पडली. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी लघुग्रहाचा अंदाज पहिल्यांदाच लावण्यात आला.


२००१: अफगाणिस्तान हल्ला - सप्टेंबर ११ च्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला.


१९९६: फॉक्स न्यूज चॅनलचे प्रसारण सुरू झाले होते.


१९८७: खलिस्तान - शीख राष्ट्रवादीं लोकांनी भारतापासून खलिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली, त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता नाही.


१९७७: सोव्हिएत युनियनाने चौथी राज्यघटना स्वीकारली गेली.


१९७१: ओमान देशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश झाला होता.


१९६३:  अमेरिकेचे अध्यक्ष केनेडी यांनी आंशिक अणु चाचणी बंदी कराराच्या मंजुरीवर स्वाक्षरी केली.


१९५९: प्रोब लुना 3 - सोव्हिएत अंतराळयानाने चंद्राच्या दूरच्या बाजूची पहिली छायाचित्रे प्रसारित केली.


१९५०: मिशनरीज ऑफ चॅरिटी - मदर तेरेसा यांनी संस्थेची स्थापना केली.


१९४९: जर्मन डेमॉक्रेटिक रिपब्लिक (पूर्व जर्मनी) स्थापना झाली होती.

१९४०: दुसरे महायुद्ध - मॅकॉलम मेमो: जपानी लोकांना अमेरिकेवर हल्ला करण्यास चिथावणी देऊन अमेरिकेला युरोपमधील युद्धात आणण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.


१९३३: एअर फ्रान्स - पाच छोट्या कंपन् एकत्रीकरण करुन एअर फ्रान्स ही कंपनी स्थापण्यात आली.


१९१९: के. एल. एम. (KLM) - या विमान कंपनीची स्थापना झाली. ही सर्वात जुनी एअरलाइन आहे जी अजूनही तिच्या मूळ नावाने कार्यरत आहे.


१९१९:  महात्मा गांधींनी नवजीवन हे वृत्तपत्र सुरू केले होते.


१९१३: फोर्ड मोटर कंपनी - पहिली फिरती वाहन असेंबली लाइन सादर केली.


१९१२: हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज - सुरू झाले.


१९०५: पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली होती तसेच अशा प्रकारचा हा पहिलाचा प्रयत्न होता.


१८२६: ग्रॅनाइट रेल्वे - अमेरिकेमधील पहिली चार्टर्ड रेल्वे म्हणून काम सुरू केले.


इ.स.पू. ३७६१: जगाचा पहिला दिवस - हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.