ST Worker Samp: एसटी कर्मचारी संपामुळे सामान्य प्रवाशांचे हाल; जाणून घ्या कोणत्या मार्गावरील बस बंद अन् सुरू

ST Worker Samp Maharastra: एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आज राज्यस्तरीय धरणे आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे राज्यातील एसटींची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
ST Worker Samp Maharastra
ST Worker Samp MaharastraEsakal
Updated on

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनाप्रमाणे वेतन मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आज राज्यस्तरीय धरणे आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे राज्यातील एसटींची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन चिघळल्यास सामान्य प्रवाशांना मोठा फटका बसू शकतो.

दरम्यान एसटी सेवेच्या माहितीसाठी अनेक स्थानकांत फोन करणाऱ्या प्रवाशांना स्थानकातून प्रतिसाद मिळेना झाला आहे, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

ई-सकाळनेही आज कोणत्या मार्गावर बस सुरू आणि बंद आहेत याची चौकशी करण्यासाठी फोन केले असता अनेक स्थानकांमधून प्रतिसाद मिळाला नाही.

कोणत्या मार्गावर बस सुरू अन् बंद

दरम्यान कोल्हापूर, मिरज आणि सातारा बस स्थानकांतून आम्हाला प्रतिसाद मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरातून पुणे-मुंबईकडे धावणाऱ्या बस सुरू आहेत. तर मिरज आणि सातारा स्थानकातून 10 टक्के बस धावत असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान सातारा जिल्ह्यातील अनेक आगारातून सकाळपासून एकही बाहेर पडली नसल्याची माहिती आहे.

स्वारगेट बस स्थानकातील स्थिती

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे स्वारगेट बस स्थानकातून जाणाऱ्या सर्व गाड्या बंद असल्याची माहिती मिळाली असून, फक्त रात्री मुक्कामी असलेल्या गाड्या स्थानकाबाहेर पडणार आहेत. दरम्यान आजच्या संपात ड्रायव्हर, कंडक्टर आणि वर्कशॉपमधी 500 हून अधिक कर्मचारी सहभागी होणार आहे.

या संपावेळी स्वारगेट बस स्थानकात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.

ST Worker Samp Maharastra
Vanraj Andekar Murder: वनराज आंदेकर यांच्या खुनास कारण ठरलेले दुकान कुठे आणि कशाचे? नेमका काय होता वाद?

काय आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्या

गेल्या काही वर्षामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी केलेल्या मागण्यांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनाही सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वेतन मिळावे ही प्रमुख मागणी आहे. कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस वैद्यकीय सेवा सुरू करावी आणि यासह कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही एसटीत मोफत पास सवलत द्यावी अशा अनेक मागण्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.