Sharad Pawar Threat Case: शरद पवार धमकी प्रकरणी एकाला अटक; आरोपीला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी

शरद पवारांना धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक केली आहे
BJP Chandrashekhar Bawankule On NCP chief Sharad Pawar death threat row
BJP Chandrashekhar Bawankule On NCP chief Sharad Pawar death threat rowesakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्या एका आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने काल (रविवारी) अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बर्वे (वय 34) असं आरोपीचं नाव आहे. सागर बर्वे या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपी सागर बर्वे हा आयटी इंजिनीअर आहे. (Latest Marathi News)

अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केलं आहे. संबधित प्रकरणात आरोपीला स्थानिक न्यायालयाने 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.(Latest Marathi News)

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रीया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट देखील घेतली होती. शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती.

BJP Chandrashekhar Bawankule On NCP chief Sharad Pawar death threat row
Sakal Podcast :गुजरातवर कोटींचा कर्जबोजा ते घराणेशाहीला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा

मुंबई पोलिसांनी तात्काळ दखल घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला. तांत्रिक बाबींचा आधार घेत पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. आरोपी सागर बर्वे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असून त्यानंच दोन्ही अकाउंट तयार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

BJP Chandrashekhar Bawankule On NCP chief Sharad Pawar death threat row
Ashadhi Wari 2023 : 'आळंदीत लाठीचार्ज झालाच नाही', गृहमंत्री फडणवीसांनी सांगितला नेमका प्रकार

राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक अकाउंटवरुन 'नर्मदाबाई पटवर्धन' या नावाने एक अकाउंट आहे. त्यावर असलेल्या पोस्टमध्ये शरद पवार यांना उद्देशून 'तुझा लवकरच दाभोलकर होणार', अशी धमकी देण्यात आली होती. तर सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर हँडलवरुन शरद पवार यांची औरंगजेबासोबत तुलना करत आक्षेपार्ह भाषेचा वापर केलेला मजकूर टाकण्यात आला होता. (Latest Marathi News)

BJP Chandrashekhar Bawankule On NCP chief Sharad Pawar death threat row
Pune Accident : नवले ब्रिजजवळ विचित्र अपघात ! ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले, चार वाहने एकमेकांना धडकली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.