लाचखोर उपायुक्ताच्या घरातच सापडलं करोडो रुपयांचं घबाड! - ACB

ACB
ACBesakal
Updated on

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. जात पडताळणी (Caste Verification) उपायुक्तांकडे (Deputy Commissioner) कोट्यवधी रुपयांची रोकड सापडल्याचं समजतंय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption bureau) कारवाई केल्यानंतर उपायुक्ताच्या घरी सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. यामध्ये तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा जास्त घबाड हाती लागलंय.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

नितीन ढगे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात उपायुक्त असून ते जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सुद्धा आहेत. पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आणि उपायुक्त नितीन चंद्रकांत ढगे यांना 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. एसीबीनं अचानक केलेल्या या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली. त्यानंतर आज उपायुक्ताच्या घरी सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. यामध्ये तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा जास्त घबाड हाती लागलंय. तसेच सुमारे दीड कोटी रुपयांच्या मालमत्तांचे कागदपत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागलेत.

8 लाख रुपयांची लाच मागताना रंगेहाथ अटक

तक्रारदाराने त्याच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्यासाठी जिल्हा जात पडताळणी कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी नितीन ढगे यांनी तक्रारदाराकडे 8 लाख रुपयांची लाच मागितली होती, अशी माहिती समोर आली होती. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनंतर एसीबीनं सापळा रचला. त्यानंतर नितीन ढगे यांना 1 लाख 90 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडलं. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढगे सध्या एसबीच्या ताब्यात आहे. त्यांची चौकशी सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.