One Nation, One Election: "...आता वेळ आली आहे"; ‘वन नेशन, वन इलेक्शन’बाबत अजितदादांनी स्पष्ट केली भूमिका

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह सहा सदस्यी समिती 'वन नेशन. वन इलेक्शन'बाबत अहवाल सादर करणार आहेत.
Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on

मुंबई : केंद्र सरकारनं संसदेचं पाच दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवलं आहे. या अधिवेशनात 'वन नेशन, वन इलेक्शन' हे विधेयक येणार आहे. त्यानुसार, देशभरात एकाच वेळी सर्व प्रकारच्या निवडणुका घेण्याचा मानस सरकारचा आहे.

यासाठी सरकारनं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह सहा सदस्यीय समिती नेमली असून ते याबाबत अभ्यास करुन अहवाल सादर करणार आहेत. या 'वन नेशन वन इलेक्शन' धोरणाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (One Nation One Election Now time come Ajit Pawar explained his stance)

Ajit Pawar
INDIA Alliance Meeting in Mumbai : 'इंडिया नव्हे इंडी'; मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं विरोधकांच्या आघाडीला नवं नाव

समर्थनीय आणि स्वागतार्ह

अजित पवार म्हणाले, “प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मांडलेली ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिका देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक आहे. देशात सातत्यानं कुठे ना कुठे निवडणुका होत असतात. (Latest Marathi News)

यामुळे वेळ, पैसा, मनुष्यबळाचा अपव्यय होतो. विकासकामांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही, त्यामुळे विकास खुंटतो. ‘वन नेशन, वन इलेक्शन’मुळं एकाचवेळी निवडणुका होतील आणि उर्वरित वेळ विकासकामांना गती देण्यासाठी उपयोगात आणता येईल.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी मांडली होती. तिला मूर्त स्वरूप देण्याची वेळ आता आली आहे. केंद्राची ही भूमिका समर्थनीय आणि स्वागतार्ह आहे" अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिकेचे स्वागत आणि समर्थन केले आहे.

Ajit Pawar
Parliament Session: हिंदूंच्या भावना माहीत नाहीत का ? पृथ्वीराज चव्हाणांचा मोदी सरकारला थेट सवाल

ही बाब आवश्यक होती

अजितदादा पुढे म्हणाले, काळाप्रमाणं व्यवस्थेत सुधारणा अपरिहार्य असतात. परंतु त्या सुधारणा देश आणि लोकहिताच्या असल्या पाहिजेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान केंद्र सरकारनं ते धाडस दाखवलं आहे. (Marathi Tajya Batmya)

देशातील अनेक राज्यात सातत्याने होत असलेल्या निवडणुकांमुळे शासन, राजकीय पक्ष आणि उमेदवारांचा वारेमाप खर्च होतो. सतत निवडणुका झाल्याने त्या कामात प्रशासनाचा मौलिक वेळ वाया जातो. त्याचा विकासकामांना फटका बसतो. त्यामुळे ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही आवश्यक बाब होती.

Ajit Pawar
Sameer Wankhede : 'पण मी कुणाच्या बापाला....' समीर वानखेडेंचं शाहरुखला सणसणीत उत्तर

देशाचे आणि राज्याचे अनेक प्रश्न सुटतील

केंद्राच्या या भूमिकेमुळं देशाच्या आणि राज्यांच्या समोरचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल. विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल. यापूर्वी ‘वन नेशन, वन टॅक्स’ हा निर्णय मोदी सरकारनं सर्व राज्यांच्या सहमतीनं अंमलात आणला आणि यशस्वी करुन दाखवला.

त्याच धर्तीवर ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही भूमिका देशवासियांकडून मनापासून स्वीकारली जाईल, हा विश्वास आहे. मी आणि राष्ट्रवादी काँग्रस पक्ष ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिकेचं स्वागत करतो, अशा शब्दांत अजित पवारांनी या धोरणाला पाठिंबा दर्शवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.