मोठी बातमी! भाजप उमेदवार राम सातपुतेंच्या प्रतिज्ञापत्रातील एका पानावर स्वाक्षरी राहिली; ‘वंचित’च्या उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे पत्र

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे 'वंचित'चे उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणुकीचा उमदेवारी अर्ज दाखल केला. पण, त्यांच्या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी असून ते आयोगाच्या नमुन्यात नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना पत्राद्वारे कळविले आहे.
SAKAL Exclusive
SAKAL Exclusiveesakal
Updated on

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणुकीचा उमदेवारी अर्ज दाखल केला आहे. पण, त्यांच्या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी असून ते आयोगाच्या नमुन्यात नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना पत्राद्वारे कळविले आहे. दुसरीकडे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या अर्जातील एका पानावर स्वाक्षरी राहिली आहे. ही गंभीर बाब नाही, तरीपण त्यांना पुढील तीन दिवसांत ती स्वाक्षरी करावी लागेल, असे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे माढ्यातील तिन्ही उमेदवारांचे अर्ज अचूक असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.

माढा व सोलापूर या दोन्ही मतदारसंघाच्या लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरवात झाली असून १९ एप्रिलपर्यंत शेवटची मुदत आहे. दाखल अर्जांची छाननी २० एप्रिलला होणार असून २२ एप्रिल रोजी अर्ज माघार घेता येणार आहेत. दरम्यान, ज्या उमेदवारांच्या अर्जात त्रुटी राहिल्या आहेत, त्यांना अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत किंवा अर्जांच्या छाननीपर्यंत (संबंधित बाबींनुसार) पूर्तता करण्यासाठी वेळ दिला जातो. ज्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या पत्रानुसार वेळेत त्रुटींची पूर्तता केली, त्यांचे अर्ज छाननीत ग्राह्य धरले जातात, अन्यथा ते बाद होतात. तत्पूर्वी, अर्ज भरल्यानंतर काहीवेळातच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून संबंधितांना अर्जातील अर्धवट बाबी किंवा त्रुटींची कल्पना पत्राद्वारे दिली जाते. त्यानुसार त्या बाबीची वेळेत पूर्तता अपेक्षित असते. दुसरीकडे विरोधी उमेदवारांना एकमेकांच्या अर्जावर आक्षेप घेता येतो. पण, हरकतीचे मुद्दे वस्तुनिष्ठ असावे लागतात.

माढा लोकसभेसाठी अर्ज दाखल केलेले उमेदवार

  • १) रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)

  • २) खरात संदीप जनार्दन (अपक्ष)

  • ३) विजयसिंह मोहिते पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार)

  • ४) धैर्यशील मोहिते पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार)

  • ५) संतोष बिचुकले (आरपीआयए)

  • ६) भाऊसाहेब लिगाडे (अपक्ष)

  • ७) गणेश चौगुले (अपक्ष)

------------------------------------------------------------------

सोलापूर लोकसभेसाठी दाखल अर्ज

  • १) राम सातपुते (भाजप)

  • २) संस्कृती राम सातपुते (भाजप)

  • ३) परमेश्वर गेजगे (अपक्ष)

  • ४) श्रीदेवी जॉन फुलारे (अपक्ष)

  • ५) विजयकुमार उघडे (अपक्ष)

  • ६) दगडू घोडके (अपक्ष)

  • ७) विद्या दुर्गादेवी कुरणे (अपक्ष)

  • ८) राहुल बनसोडे (अपक्ष)

  • ९) अण्णा मस्के (अपक्ष)

  • १०) रविकांत बनसोडे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)

अपक्ष उमेदवारांना अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अपक्षांना मिळणार मुक्त चिन्ह

लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत दाखल अर्जांमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघात सातजण अपक्ष तर माढा मतदारसंघात तीन उमेदवार अपक्ष आहेत. अर्ज भरण्यासाठी १९ एप्रिलपर्यंत मुदत आहे. २२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून त्यावेळी अपक्षांपैकी कितीजण निवडणुकीच्या रिंगणात असणार हे स्पष्ट होणार आहे. तसेच त्या अपक्ष उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केल्याप्रमाणे मुक्त चिन्हे दिली जातात. मुक्त चिन्हांमध्ये नुसती तुतारी, रोडरोलर, नारळ अशी जवळपास पावणेदोनशे चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.