कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल 1000 रुपयाची घसरण! सोलापूर बाजार समितीत सोमवारी 283 ट्रक लाल कांद्याची आवक; प्रतिक्विंटल 3200 ते 4500 रुपयांचा भाव

कांद्याच्या दरात सोमवारी (ता. ३०) प्रतिक्विंटल एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या कांद्याच्या लिलावामध्ये जुन्या लाल कांद्यासह पांढऱ्या कांद्याच्या दरातही घसरण झाली. सध्या बाजारात नवीन कांदा येऊ लागला आहे.
onion
onionesakal
Updated on

सोलापूर : कांद्याच्या दरात सोमवारी (ता. ३०) प्रतिक्विंटल एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या कांद्याच्या लिलावामध्ये जुन्या लाल कांद्यासह पांढऱ्या कांद्याच्या दरातही घसरण झाली. सध्या बाजारात नवीन कांदा येऊ लागला आहे; मात्र त्याचेही दर कोसळल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हताश झाले आहेत.

सोमवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात २८३ ट्रक लाल कांद्याची आवक झाली. यामध्ये जुन्या कांद्याला प्रतिकिलो ४५ रुपये कमाल दर मिळाला. मात्र, प्रतिकिलो सरासरी ३२ रुपये इतकाच दर राहिला. सर्वात कमी ५०० रुपये प्रतिक्विंटल दरानेही कांदा विकला गेला. पांढऱ्या कांद्याच्या दरातही प्रतिक्विंटल एक हजार रुपयांची घसरण झाली. पांढऱ्या कांद्याचा सर्वोच्च दर प्रतिकिलो ३२ रुपये इतका राहिला. सरासरी दर प्रतिकिलो २८ रुपये इतकाच होता. गेल्या आठवड्याच्या तुलनेने दरात प्रतिक्विंटल हजार रुपयांची घसरण झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

सध्या बाजारात कांद्याचे नवीन पीक दाखल झाले आहे. सततच्या पावसामुळे नवीन कांद्याचा दर्जा खालावला आहे. यामुळे कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याची माहिती जाणकारांनी दिली. सोमवारी नवीन कांदा २८ रुपये प्रतिकिलोपर्यंत विकला गेला. सरासरी दर मात्र दोन हजार रुपये प्रतिक्विंटल इतकेच राहिले. येत्या काही आठवड्यांत बाजारात नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होणार आहे. यामुळे दराच्या बाबतीत शेतकरी चिंतातुर झाला आहे. शेतकऱ्यांना खरीप कांद्याच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. यामुळे अपेक्षित दर न मिळाल्यास खरीप कांद्याचे उत्पादन हे तोट्याचेच ठरणार आहे.

फक्त दहा पिशव्यांना मिळाला सर्वोच्च दर

सोमवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्या लाल कांद्याच्या पिशव्यांना प्रतिक्विंटल चार हजार ५०० रुपये इतका दर मिळाला. उर्वरित कांदा प्रतिक्विंटल तीन हजार २०० रुपये सरासरी दराने विकला गेला. तर दहा पिशवी पांढऱ्या कांद्याला सर्वोच्च असा तीन हजार २०० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. बाजारात सोमवारी २८ ट्रक पांढऱ्या कांद्याची आवक झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.