Onion Price Hike: पाऊस लांबल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यानुसार भाजीपाल्याचे दर दुप्पट-तिप्पट झाले आहेत. त्यापैकी टोमॅटोचे दर तर तिपटीने वाढले आहेत.
त्यामुळे महिनाभरापूर्वी किरकोळ बाजारात 20 रुपये किलोने मिळणारा टोमॅटो आता किरकोळ बाजारात 90 ते 100 रुपये किलोने खरेदी करावा लागत आहे.
आता टोमॅटोनंत देशातील बहुतांश शहरांमध्ये कांद्याची किंमत वाढू शकते. पावसाळ्यामुळे कांद्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, त्यामुळे यंदा डिसेंबरपर्यंत कांद्याचा पुरवठा कमी होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या महिन्यात राज्यातील पाच विभागांमध्ये कांद्याच्या किरकोळ किंमतीत लक्षणीय वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसून येते.
गेल्या वर्षीच्या तुलनेत ही किंमत कमी असली तरी सरकारी आकडेवारीनुसार, 2020 मध्ये भारतातील कांद्याची सरासरी किरकोळ किंमत 35.88 रुपये होती.
2021 मध्ये सरासरी किरकोळ किंमत 32.52 रुपये होती आणि 2022 मध्ये ती 28.00 रुपये प्रति किलो होती. 2023 मध्ये कांद्याचे भाव स्थिर राहिले आहेत. मात्र, येत्या काही महिन्यांत त्याची किंमत वाढू शकते.
सरकारने कांद्या विकत घेतला
सरकारने सुमारे दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांकडून सुमारे 0.14 दशलक्ष टन कांद्याचा साठा खरेदी केला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एप्रिलमध्ये सांगितले होते की केंद्र सरकार 2023-24 हंगामासाठी 3 लाख टन कांदे बफर स्टॉकमध्ये ठेवणार आहे.
आणि गेल्या हंगामात 2022-23 मध्ये 2.51 लाख टन कांदा बफर स्टॉकमध्ये ठेवण्यात आला होता. भारत सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला अहवाल दिला होता की 2021-22 मध्ये कांद्याचे उत्पादन 31.69 दशलक्ष टनांवरून 31.01 दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे.
टोमॅटोच्या दरात 80 रुपयांची वाढ
देशभरात प्रथमच टोमॅटोच्या दरावर परिणाम झाला आहे. पाऊस आणि अति उष्णतेमुळे पीक निकामी झाल्यामुळे भारतात पुरवठ्याची टंचाई निर्माण झाली आहे.
अशा स्थितीत टोमॅटोचे भाव 10 ते 20 ते 80 ते 100 रुपये किलो झाले आहेत. म्हणजेच 70 ते 80 रुपये किलोमागे वाढ झाली आहे. हवामानामुळे टोमॅटोशिवाय इतर भाज्यांचे दर घाऊक आणि किरकोळ बाजारात वाढले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.