नाशिक : केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत एकूण ५ लाख टनांपैकी सव्वादोन लाखांवर रब्बी कांद्याची खरेदी ‘नाफेड’कडून मागील महिन्यात आटोपली, असे असतानाच एकच महिन्यात हा कांदा बाजारात आणण्याची घाई सुरू झाली आहे. त्यासाठी मुंबई, बंगळूर, भुवनेश्वर व पाटना या शाखेच्या माध्यमातून निविदा काढण्यात आल्या आहेत.
एकीकडे दरात पुन्हा घसरण आहे, तर दुसरीकडे ग्राहकांची ओरड नाही. असे असताना या माध्यमातून अधिकाऱ्यांकडून कांदा खरेदीतील सावळागोंधळ झाकला जात असल्याची चर्चा सुरू आहे.