कांद्याला यंदा मिळणार ६०००पर्यंत भाव! सोलापूर जिल्ह्यात २९ हजार हेक्टरवर कांदा लागवड; शेपू, मेथी, कोथिंबिरही वधारली

डिसेंबर-जानेवारीत कांद्याची आवक वाढेल, तोवर भाव कमी-अधिक राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यंदा अंदाजे कांद्याचा सरासरी दर तीन ते साडेतीन हजारांपर्यंत, तर सर्वाधिक दर सहा ते साडेसहा हजारांपर्यंत राहील, असाही अंदाज वर्तविला जात आहे.
onion cultivation
onion cultivationsakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाला, तरीदेखील कांदा लागवडीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील २९ हजार हेक्टरवर लागवड झाली, पण पाण्याअभावी उत्पन्नात घट होईल, अशी शक्यता आहे. गतवर्षी जिल्ह्यात १९ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. यंदा कांद्याची आवक कमी असल्याने सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाव वाढू लागला आहे.

राज्य सरकारने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये कांद्याचे दर खूपच गडगडल्याने प्रतिक्विंटल ३५० रुपयांचे अनुदान जाहीर केले. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कांदा बाजार समितीत आणून विकला. त्यामुळे सणासुदीत आता बाजारात कांदा कमी आणि मागणी जास्त, अशी स्थिती आहे.

बाजार समितीत कांद्याला सध्या सरासरी दर सतराशे ते एकोणिसशे रुपयांपर्यंत मिळत आहे. सोलापूर बाजार समितीत दररोज १३० ट्रक कांदा आवक होत असून सोलापूरसह शेजारील जिल्ह्यातून कांदा याठिकाणी येत असल्याची माहिती बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली. डिसेंबर-जानेवारीत कांद्याची आवक वाढेल, तोवर भाव कमी-अधिक राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यंदा अंदाजे कांद्याचा सरासरी दर तीन ते साडेतीन हजारांपर्यंत, तर सर्वाधिक दर सहा ते साडेसहा हजारांपर्यंत राहील, असाही अंदाज वर्तविला जात आहे.

सोलापूर बाजार समितीतील दर

  • - प्रतिक्विंटल सरासरी दर १७०० ते १९०० रुपये

  • - १६ व १७ ऑक्टोबरला क्विंटलला मिळाला ४५०० रुपयांचा भाव

  • - पांढऱ्या कांद्याला मंगळवारी मिळाला ५१०० रुपये (फक्त ३ क्विंटल कांदा त्या दराने विकला)

  • - १७ ऑक्टोबर रोजी एकूण कांद्यातील तीन क्विंटल कांद्याला मिळाला ४५०० रुपयांचा भाव

  • - बाजार समितीत आलेल्या एकूण आवकमधील ११ हजार ६८७ क्विंटल कांदा २००० रुपये दराने विकला

भाजीपाल्यालाही समाधानकारक दर

यंदा जिल्ह्यातील करमाळा, माढा, बार्शी, माळशिरस व सांगोला या तालुक्यांमध्ये पावसाअभावी दुष्काळ जाहीर होईल, अशी स्थिती आहे. शेतमालाची लागवड देखील शेतकऱ्यांना करता आलेली नाही. आवक कमी पण मागणी जास्त असल्याने शेपूला १० रुपये तर मेथीला १६ रुपये (पेंडी) दर मिळत आहे. दुसरीकडे कोथिंबीरचे दरही आता वाढत असून सध्या सोलापूर बाजार समितीत प्रतिपेंडीला ५ ते १५ रुपयांचा दर मिळू लागला आहे. समाधानकारक दर मिळत असल्याने अडचणीतील शेतकरी सुखावला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.