मोठी बातमी! ऑनलाइन अर्जदार लाडक्या बहिणींची माहितीच समजेना; लाभार्थींना मिळणार दोन टप्प्यात लाभ; 31 जुलै आणि 31 ऑगस्ट असे असतील लाभाचे दोन टप्पे

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ९५ हजार लाडक्या बहिणींनी ऑफलाइन अर्ज केले असून त्या अर्जांची पडताळणी सुरू झाली आहे. परंतु, ऑनलाइन अर्जदार महिलांची माहिती अजूनही अधिकाऱ्यांना दिसत नाही.
Maharashtra Nari Shakti Doot App
Maharashtra Nari Shakti Doot Appesakal
Updated on

सोलापूर : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ९५ हजार लाडक्या बहिणींनी ऑफलाइन अर्ज केले असून त्या अर्जांची पडताळणी सुरू झाली आहे. परंतु, ऑनलाइन अर्जदार महिलांची माहिती अजूनही अधिकाऱ्यांना दिसत नाही. त्यामुळे त्या अर्जांची पडताळणी अद्याप झालेली नाही. या पार्श्वभूमीवर सर्वच अर्जदार महिलांना १५ ऑगस्टपर्यंत लाभ मिळणार नाही, अशी सद्य:स्थिती आहे.

राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत सध्या ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्जांची संख्या ५० लाखांपर्यंत पोचली आहे. त्यात ऑफलाइन अर्जांची संख्या दिसते, पण ऑनलाइन किती अर्ज आले हे समजत नाही. ऑफलाइन अर्ज अंगणवाड्यांच्या सेविका ऑनलाइन भरत आहेत. अंगणवाडी सेविका आवश्यक ते कागदपत्रे जोडून अर्ज भरून घेत आहेत. त्यामुळे कोणाच्या कागदपत्रात त्रुटी आहेत, ते जागेवरच लाडक्या बहिणींना सांगितले जात आहे. पण, ऑनलाइन अर्ज केलेल्यांना त्यासंदर्भात काहीच समजत नाही. त्यात पात्र कोण अन्‌ अपात्र कोण हे अधिकाऱ्यांना समजण्यासाठी ‘नारीशक्ती दूत’ ॲपवरील अर्जदारांची माहितीच उपलब्ध झालेली नाही.

अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट आहे, पण लाडक्या बहिणींना १५ ऑगस्ट रोजी लाभ वितरित होणार आहे. तत्पूर्वी, अर्जांची छाननी, तात्पुरती यादी, हरकती-सुनावणी व अंतिम यादी असे टप्पे आहेत. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळेल आणि १ ते ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळणार आहे. पण, त्यासाठी ॲपवरील ऑनलाइन अर्जदारांची माहिती अधिकाऱ्यांना उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

ऑफलाइन अर्जांची पडताळणी सुरू, आतापर्यंत एक लाख अर्ज

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील जवळपास एक लाख महिलांनी ऑफलाइन अर्ज केले आहेत. तर ऑनलाइन अर्जदार महिलांचीही संख्या जास्त आहे. पण, ऑनलाइन अर्ज केलेल्यांची माहिती समजत नसल्याने सध्या ऑफलाइन अर्जांची पडताळणी केली जात आहे.

- प्रसाद मिरकले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

लाभार्थींची तात्पुरती यादी अन्‌ नंतर अंतिम यादी

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या सर्व अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. त्यानुसार गावनिहाय तात्पुरत्या याद्या प्रसिद्ध होतील. याद्यांवर काही आक्षेप असल्यास ते नोंदविण्यासाठी पाच दिवसांची मुदत दिली जाणार असून त्यानंतर पुढील तीन-चार दिवसांत आक्षेपांवर निर्णय होईल. शेवटी अंतिम यादी प्रसिद्ध करून शासनाला पाठविली जाईल व त्या लाडक्या बहिणींच्या खात्यात १ जुलैपासून १५०० रुपये जमा होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com