गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महायुती, महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी जागावाटपाच्या हालचालीही सुरू केल्या आहेत. याचबरोबर प्रत्येक पक्षाने आपल्या पद्धतीने प्रचारालाही सुरूवात केली आहे.
अशात आता विधानसभा निवडणुकीचा ओपिनिअन पोल समोर आला आहे. हा पोल देशात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपची झोप उडवणार आहे. कारण या ओपिनिअन पोलमधून विधानसभा निवडणुकीत भाजपचे मोठे नुकसान होताना दिसत आहे.