पुणे - जागतिक शेतीमालाच्या निर्यातीचे तंत्र उलगडून दाखविणारा ‘ॲग्रोवन’चा पहिला दुबई कृषी अभ्यास दौरा यशस्वी होताच आता दुसऱ्या दौऱ्याची तयारी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ६ ते ११ ऑक्टोबर दरम्यान होत असलेल्या या दौऱ्यात शेतकरी तसेच व्यावसायिकांना ‘ॲग्रा-मी’ या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला भेट देण्याची संधी मिळेल. शिवाय अभ्यासाबरोबरच फावल्या वेळात स्थलदर्शन आणि खरेदीचा आनंदही लुटता येईल.