पेनड्राईव्ह प्रकरण CBI ऐवजी CID कडं; विरोधकांचा सभात्याग

मागणी मान्य न झाल्यास कोर्टात जाण्याचा फडणवीसांचा इशारा
Devendra Fadnvis
Devendra FadnvisFile Photo
Updated on

मुंबई : पेनड्राईव्ह प्रकरण सीबीआयकडं (CBI) देण्याची मागणी मान्य न झाल्यानं विरोधकांनी अखेर सभात्याग केला. या स्टिंग ऑपरेशनचा तपास सीआयडीकडं दिल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil) यांनी विधानसभेत जाहीर केलं. त्यानंतर वळसे पाटलांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnvis) आपण सभात्याग करत असल्याचं जाहीर केलं आणि भाजप सदस्यांसह ते सभागृहाबाहेर पडले. (Opposition abandon meeting due to not sanction demand of Pendrive case)

Devendra Fadnvis
फडणवीसांच्या दुसऱ्या पेन ड्राईव्ह बॉम्बवर वळसे पाटलांचं उत्तर

फडणवीस म्हणाले, जो पेन ड्राईव्ह मी सभागृहात दिला आहे, त्यामध्ये गिरीश महाजनांविरोधात कटकारस्थान केल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. इतरही अनेक प्रकरण यामध्ये आहेत. या परिस्थितीत राज्याचे पोलीस याची चौकशी करणार? त्यांच्यावर दबाव येणार आहे. त्यामुळं आम्ही या प्रकरणाचा तपास सीबीआयकडं देण्याची मागणी केली होती. पण वळसे पाटील यांच्यासारखा अनुभवी आणि मुरब्बी नेता देखील अडखळत होता.

Devendra Fadnvis
'द काश्मीर फाईल्स' टॅक्स फ्री वर गृहमंत्र्यांचं सभागृहात उत्तर

त्यामुळं जोपर्यंत ही चौकशी सीबीआयकडे जात नाही तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहणार आहे. याप्रकरणी आम्ही कोर्टात देखील जाणार आहोत. ही सगळी चौकशी सीबीआयकडे गेली तर फार मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश यासंदर्भात होणार आहे, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

Devendra Fadnvis
स्टिंग ऑपरेशनचा तपास CIDकडं, सरकारी वकिलांनी दिला राजीनामा - गृहमंत्री

त्याचबरोबर लांबे यांच्यासंदर्भात मी सभागृहात जी क्लीप दिली आहे. त्यातून या सरकारमध्ये ज्या लोकांची दाऊदसोबत जवळीक आहे त्यांना प्राधान्य आहे. त्यामुळं अशा लोकांची नियुक्ती तिथं होतं आहे. यामुळं ते कसे निवडून आले आहेत आणि त्यांचा राष्ट्रवादीशी काय संबंध आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळं दाऊदशी राष्ट्रवादीचे कसे संबंध आहेत याचा आम्ही पर्दाफाश केला आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()