Monsoon Session 2023 : किरीट सोमय्या प्रकरणी विरोधक आक्रमक, देवेंद्र फडणवीस उचलणार मोठे पाऊल?

Kirit Somaiya Viral Video : कथित व्हिडीओ प्रकरणी सोमय्यांची चौकशीची मागणी
Monsoon Session
Monsoon SessionEsakal
Updated on

Kirit Somaiya Video News : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या व्हायरल व्हिडीओ प्रकरणात आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. दरम्यान आज विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी हे प्रकरण सभागृहात गाजण्याची शक्यता आहे.(Latest Marathi News)

तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही, व्हिडिओची सत्यता तपासून घ्यावी अशी विनंती किरीट सोमय्या यांनी केली आहे.

Monsoon Session
Monsoon Session 2023: उपसभापती नीलम गोऱ्हे यांना हटवण्याच्या मुद्यावरून आज बैठक, फडणवीस यांच्यासह 'हे' नेते राहणार उपस्थितीत

या विषयावरून आज विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी हे प्रकरण सभागृहात गाजण्याची शक्यता आहे. तर सोमय्या यांनी लिहलेल्या पत्रावर देवेंद्र फडणवीस याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणंही महत्त्वाचे ठरणार आहे. आज विधीमंडळ अधिवेशनात ठाकरे गटाचे आमदार याबद्दल आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्या विरोधाची दखल घेत फडणवीस सत्यता पडताळून पाहण्याची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.(Latest Marathi News)

Monsoon Session
Accident News: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू तर आठ जण जखमी

महाराष्ट्राचे भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ एका मराठी वृत्त वाहिनीने समोर आणला आहे. अशा प्रकारचा व्हिडिओ त्यांच्या हाती असल्याचा दावा हे चॅनल करत आहे, ज्यामध्ये किरीट सोमय्या आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. दरम्यान या प्रकरणी आता किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं आहे. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.(Latest Marathi News)

Monsoon Session
Jitendra Awhad: '10-15 दिवसांनी जाणीव होते आपली विकेट गेली', जितेंद्र आव्हाडांचा रोख कोणाकडे?

किरीट सोमय्यांचं फडणवीसांनी पत्र

या प्रकरणी चौकशीची मागणी करणारं पत्र सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहीलं आहे. "देवेंद्रजी, आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे."

"मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी" असं पत्रात किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.