मुंबईत आणि राज्यात कायदा-सुव्यवस्था उत्तम आहे. पण ती राहिली नसल्याचं दाखवण्याचा प्रयत्न सध्या विरोधकांकडून सुरु आहे, असा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे. विविध घटनांच्या माध्यमातून विरोधकांचा हा प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषद घेऊन गृहमंत्र्यांनी ही सर्व परिस्थिती कथन केली आहे. (Opposition try to show there is no law and order in Maharashtra says Dilip Walase)
वळसे पाटील म्हणाले, मुंबई आणि महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था उत्तम आहे, पण ती राहिली नसल्याचं दाखवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून ते हे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. एखाद्या ठिकाणी जर दुर्दवी घटना घडली तर आख्या मुंबईतील कायदा-सुव्यवस्था बिघडली अशा निष्कर्षाला येणं योग्य नाही. तसेच याविरोधात अनावश्यकरीत्या रस्त्यावर उतरुन वर्तन करणं चुकीचं आहे.
आपापल्या घरांमध्ये हनुमान चालिसा वाचावं
राणा दाम्पत्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना वळसे म्हणाले, राणांना कुठल्याही प्रश्नाला मला उत्तर द्यायचं नाही. मुख्यमंत्री किंवा मी गृहमंत्री म्हणून कोणत्याही प्रकारचे निर्देश देत नाही. यामध्ये युनिट कमांडर म्हणजे पोलीस आयुक्तांनी निर्णय घेऊन कारवाई करायची असते. राज्यात राष्ट्रपती राजवट लावणयासाठी भाजपकडून असं वातावरण तयार केलं जात आहे. यामध्ये दंगली घडवणं, भोग्यांचा विषय काढून ते घडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता हनुमान चालिसा कोणाला वाचायची असेल तर ज्यानं त्यानं ती आपल्या घरी वाचावी. मग ती अमरावतीच्या घरी वाचावी, मुंबईच्या घरी वाचावी किंवा दिल्लीच्या घरी जाऊन वाचावी. एखाद्या ठिकाणीच जाऊन ती वाचायची हा हट्ट कशासाठी? असा सवालही त्यांनी केला.
राज्यात राष्ट्रपती राजवट लावणं शक्य नाही
कोरोनाच्या काळातही मंदिरं बंद अससताना ती सुरु करा अशी मागणी करण्यात आली. त्यासाठी आरत्या, महाआरत्या केल्या गेल्या. अशा विविध प्रकारे विरोधीपक्षाकडून राज्यात असं दाखवण्याचा प्रकार केला जातोय की, राज्यात कायदा सुव्यवस्था व्यवस्थित नाही. म्हणून राष्ट्रपती राजवट लावा. पण ते शक्य नाही, राज्यात कायदा सुव्यवस्था आबाधित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.