मोठी बातमी! रेशनकार्डात नाव नसलेल्या बहिणींना विवाह प्रमाणपत्राचा पर्याय; तृतीयपंथी योजनेसाठी पात्र आहेत का? ‘या’ दिवशी मिळणार बहिणींना ३००० रूपये एकदम

अनेक महिलांकडे १२ वर्षांपूर्वीचे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड नसल्याची बाब निदर्शनास आली. काहींकडे रेशनकार्ड आहे, पण त्यात संबंधित अर्जदार महिलांची नावे नाहीत. त्यांच्यासाठी विवाह प्रमाणपत्राचा (मॅरेज सर्टिफिकेट) पर्याय देण्यात आला आहे.
Majhi ladki Bahin Yojana
Majhi ladki Bahin Yojanaesakal
Updated on

सोलापूर : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील पावणेदोन लाख महिलांनी ऑफलाइन तर ऑनलाइन अर्ज भरलेल्या लाडक्या बहिणींची संख्या देखील २५ हजारांपेक्षा जास्त आहे. शनिवारी (ता. २०) गावोगावी याद्यांचे चावडी वाचन झाले असून त्यात अनेक महिलांकडे १२ वर्षांपूर्वीचे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड नसल्याची बाब निदर्शनास आली. काहींकडे रेशनकार्ड आहे, पण त्यात संबंधित अर्जदार महिलांची नावे नाहीत. त्यांच्यासाठी विवाह प्रमाणपत्राचा (मॅरेज सर्टिफिकेट) पर्याय देण्यात आला आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. सध्या जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक महिलांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज केले आहेत. वार्षिक अडीच लाख रूपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना (कुटुंबातील दोन) योजनेत अर्ज करता येणार आहे. पण, संबंधित अर्जदार महिलेच्या कुटुंबात चारचाकी वाहन नको, अशीही अट आहे. १५ ते १९ ऑगस्ट या काळात (१ जुलैपासून) अर्जदार लाभार्थी लाडक्या बहिणीच्या बॅंक खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रूपये वितरीत केले जाणार आहेत. त्याअनुषंगाने आता प्रत्येक ग्रामपंचायतीत याद्यांचे चावडी वाचन होऊन ग्रामस्तरीय समित्यांकडून याद्या आता तालुकास्तरीय समित्यांकडे पाठविण्यात आल्या आहेत.

प्रारूप याद्या आता दर शनिवारी

शनिवारी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जांचे चावडी वाचन झाले. ग्रामस्तरीय समित्यांकडील याद्या आता पुढे तालुकास्तरीय समित्यांना सादर होतील. तत्पूर्वी, प्राप्त अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. दर शनिवारी अर्जदारांच्या प्रारूप याद्या प्रसिद्ध होऊन त्या अंतिम होतील.

- प्रसाद मिरकले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

तृतीयपंथी योजनेसाठी पात्र आहेत का?

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेसाठी २१ ते ६५ वयोगटातील महिला-तरूणी पात्र आहेत. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रूपयांपर्यंत व घरात चारचाकी वाहन नसावे अशा योजनेच्या अटी आहेत. या सर्व अटींची पूर्तता पूर्ण होत असतानाही तृतीयपंथी या योजनेपासून दूरच आहेत. समाजातील दुर्लक्षित या घटकास मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेतून अर्ज करता येईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.तृतीयपंथी योजनेसाठी पात्र आहेत का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.