पुणे - मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या (Motor Driving School) मोटारी आणि दुचाकी वाहनांची परिवहन (ट्रान्स्पोर्ट) (Transport) संवर्गात या पुढे नोंदणी (Registration) न करण्याचे आदेश राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे (Dr Avinash Dhakane) यांनी दिला आहे. त्याचा फायदा राज्यातील सुमारे १८ हजार मोटार ड्रायव्हिंग स्कूलचालकांना होणार आहे. (Order not to Register Vehicles of Motor Driving School in Transport Category)
पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात सुमारे ७५० मोटार ड्रायव्हिंग स्कूल आहेत. स्कूल चालकांकडे असलेल्या वाहनांची नोंदणी या पूर्वी ट्रान्स्पोर्ट संवर्गात होत होती. त्यामुळे त्यांना अतिरिक्त कर द्यावा लागत होता. तसेच विमा हप्त्यांतही ६० टक्के रक्कम अधिक द्यावी लागत होती. त्यामुळे मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत होता. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ग्राहक कमी झाल्यामुळे स्कूलचालक अडचणीत आले होते.
या पार्श्वभूमीवर राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे अध्यक्ष राजू घाटोळे, महासचिव यशवंत कुंभार, उपाध्यक्ष अनंत कुंभार, प्रवक्ते व पनवेल विभागाचे प्रमुख विवेक खाडे, ठाणे विभागाचे प्रवीण महांकाळ, मुंबई विभागाच्या प्रमुख सुनीता चौहान, बोरिवली वसई-विरार विभागाच्या प्रमुख भारती नीलेश पाटील, पिंपरी-चिंचवड विभागाचे व राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनंत कुंभार आदींनी ढाकणे यांची नुकतीच भेट घेतली. त्यात मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या अडचणी मांडल्या. त्याला ढाकणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी या बाबतचा आदेश राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना पाठविला. त्यात या पुढे स्कूल चालकांच्या दुचाकी आणि मोटारींची नोंदणी परिवहन विभागात न करण्याचे आदेश दिले. त्यामुळे स्कूलचालकांची आता ट्रक, रिक्षा, टेंपो आदी वाहनेच परिवहन संवर्गात नोंदली जातील. मात्र, ड्रायव्हिंग स्कूलकडील दुचाकी आणि मोटारींची वार्षिक तपासणी करावी लागेल, असेही ढाकणे यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
परिवहन आयुक्त ढाकणे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मोटार ड्रायव्हिंग स्कूलचालकांना दिलासा मिळाला आहे. एकरकमी कर आणि विम्याच्या हप्त्यात आता सुमारे ५० टक्के बचत होणार आहे. त्यामुळे आम्ही राज्य सरकारचे मनापासून आभार मानतो.
- राजू घाटोळे, अध्यक्ष, राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.