सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी १७ हजार २०२ कर्मचारी (११० टक्के) नेमले आहेत. पण, त्यातील ७३५ कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या प्रशिक्षणाला दांडी मारली होती. त्यातील कामावर रुजू झालेले, सेवानिवृत्त, राजीनामा दिलेले, वैद्यकीय कारणास्तव ड्युटी रद्द झालेले कर्मचारी वगळून उर्वरित १३४ कर्मचारी ड्युटीवर आलेच नाहीत. त्या कर्मचाऱ्यांची आता विभागीय चौकशी किंवा गुन्हे दाखल केले जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात तीन हजार ७३८ मतदान केंद्रे असून त्यात ग्रामीणमध्ये दोन हजार ५५५ तर शहरात एक हजार १८३ मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रावर प्रत्यक्षात काम करण्यासाठी जवळपास १५ हजार कर्मचारी लागणार आहेत. उमेदवार निश्चित झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सुरवात झाली. काही दिवसांपूर्वी दुसरे प्रशिक्षण पार पडले. त्यात पहिल्या व दुसऱ्या प्रशिक्षणासाठी जवळपास एक हजार कर्मचारी अनुपस्थित राहिले.
दुसऱ्या प्रशिक्षणासाठी ७३५ जण गैरहजर राहिल्याचे दिसून आले. त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संपर्क साधला व त्यांच्याकडून खुलासे मागविले. एकूण गैरहजर कर्मचाऱ्यांमधील १३४ जणांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस देवूनही खुलासा सादर केला नाही. त्यामुळे निवडणूक कर्तव्यावर नेमलेले असतानाही अनुपस्थित राहून कर्तव्य पार पाडण्यात कसुरी केल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार त्या कर्मचाऱ्यांवर आता कठोर कारवाई होणार आहे.
गुन्हा दाखल होणारे कर्मचारी
मतदारसंघ कर्मचारी
माढा ०१
सोलापूर शहर उत्तर १५
शहर मध्य १३
अक्कलकोट १८
दक्षिण सोलापूर २७
पंढरपूर-मंगळवेढा ४५
सांगोला १२
माळशिरस ०३
एकूण १३४
पोलिसांकडून १८,३४० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व ग्रामीण पोलिसांनी एकूण १८ हजार ३४० सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यातील अनेकांना तडीपार केले तर काहींना नोटीसा बजावल्या आहेत. काहींकडून चांगल्या वागणुकीचे बॉण्ड लिहून घेतले आहेत. याशिवाय तब्बल सव्वाचार लिटर दारु, ९७२ ग्रॅम गांजा, ३० लाख ५९ हजार ८८० रुपयांची रोकड पोलिसांनी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली आहे. सहा पिस्टल आठ कोयते व ३५ तलवारी देखील जप्त केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.