Politics : 'सेनेचे 12 खासदार शिंदे गटासोबत गेले असले तरी मी उद्धव ठाकरेंसोबत कायम राहणार'

ज्या घरात राजकारणाच गंध नव्हता, अशा लोकांना बाळासाहेब ठाकरे यांनी आमदार, खासदार, मंत्री केले.
shivsena political news
shivsena political news
Updated on
Summary

ज्या घरात राजकारणाच गंध नव्हता, अशा लोकांना बाळासाहेब ठाकरे यांनी आमदार, खासदार, मंत्री केले.

शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटासोबत गेले असले तरी मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबतच कायम राहणार आहे. मरेपर्यंत मी या पक्षाची आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, अशी ग्वाही उस्मानाबादचे (Osmanabad) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. ज्या घरात राजकारणाच गंध नव्हता, कुणी साधी ग्रामपंचायत लढवली नव्हती, अशा लोकांना बाळासाहेब ठाकरे यांनी आमदार, खासदार, मंत्री केले. याची जाणीव माझ्या सारख्या शिवसैनिकाला आहे. त्यामुळे मरेपर्यंत मी कधीही शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सोडणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

काल पक्षप्रमुख ठाकरे यांचा वाढदिवस होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते बंडखोर आमदारांपर्यंत सर्वानी ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, मात्र त्या देताना पक्षप्रमुख असा उल्लेख न करण्याचा खोडसाळपणा केला. या पार्श्वभूमीवर खासदार (Omraje Nimbalkar) निंबाळकर यांनी बंडखोरांना खडेबोल सुनावले आहेत. आपली निष्ठा कायम शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहील असंही ते म्हणाले.

shivsena political news
आमची निष्ठा पैशाने विकली जात नाही, आम्ही पवारनिष्ठ!; राष्ट्रवादीच्या आमदाराचा महेश शिंदेंवर पलटवार

पुढे ते म्हणाले की, शिवसेनेचा आजपर्यंतचा इतिहास पहा, जेव्हा जेव्हा पक्ष संपवण्याची भाषा, फुट आणि गद्दारी झाली, तेव्हा जेव्हा शिवसैनिक पेटून उठला आहे. शिवसेना हे एक कुटुंब आहे, ज्याला राजकारणातलं काहीचं कळत नव्हतं, त्यांच्या घरात कुणी कधी राजकारणात नव्हतं अशा लोकांना बाळासाहेब ठाकरे आणि आता उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या, केंद्राच्या उच्चपदावर नेऊन बसवलं आहे. माझ्या सारखा सामान्य कार्यकर्ता आमदार, खासदार होऊ शकला हे विसरता येणार नाही.

जे आज पक्षाला सोडून गेले आहेत, त्यांना भविष्यात शिवसैनिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, अंस म्हणत त्यांनी बंडखोर आमदारांना खडे बोल सुवावलं आहे. शिवसेनेला जेव्हा असे धक्के देण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा शिवसैनिक पेटून उठला आहे, हा इतिहास पहाता, गद्दारांना निवडणुकीत निश्चित धडा शिकवला जाईल, असा इशाराही खासदार निंबाळकर यांनी दिला.

shivsena political news
संजय राऊत यांच्या ट्रॅपमधून उद्धव ठाकरेंनी बाहेर पडावं, बावनकुळेंचा सल्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.