Osmanabad ZP| उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या गटाची प्रारुप प्रभाग रचना जाहीर

पंचायत समितीच्या गणाची प्रारुप प्रभाग रचनाही जाहीर
Osmanabad Zilla Parishad
Osmanabad Zilla Parishadsakal
Updated on

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या गटाची व पंचायत समितीच्या गणाची प्रारुप प्रभाग रचना गूरुवारी (ता.दोन) अधिकृत प्रसिध्द करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या सहा सदस्यांची भर पडली आहे. अगोदर ५५ सदस्य होते. आता ती ६१ संख्या असणार आहेत. त्यात उस्मानाबादमध्ये (Osmanabad) दोन, कळंब, तुळजापुर, लोहारा व परंडा येथे प्रत्येकी एक गट वाढल्याचे दिसुन येत आहे. वाढलेल्या गटामुळे राजकीय अस्थिरता अधिक वाढणार असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक तालुक्यातील राजकीय गणित वेगळे असल्याने प्रत्येक पक्षाला एकमेकावर विसंबून राहण्याची वेळ येणार अस दिसत आहे. (Osmanabad Zilla Parishad Gat And Pachanchayat Gan Structure Declared)

Osmanabad Zilla Parishad
अकोला : जिल्ह्यातील २७४ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना जाहीर

जिल्ह्याची राजकीय स्थिती पाहिली, तर तालुकानिहाय पक्षीय पातळीवर राजकीय शक्ती कमी-अधिक प्रमाणात दिसते. उस्मानाबाद, कळंब या ठिकाणी शिवसेना (Shiv Sena) व भाजप (BJP) यांच्यात खऱ्या अर्थाने लढत राहणार आहे. तुलनेने इतर पक्षाची शक्ती कमी आहे. तुळजापूरमध्ये भाजप व काँग्रेस यांचे बळ अधिक असुन इतर पक्षाची शक्ती कमी दिसुन येते. भूम, परंडा व वाशी या तीन तालुक्यामध्ये शिवसेना व राष्ट्रवादी हे प्रबळ पक्ष असुन काही प्रमाणात भाजपचीही शक्ती त्या ठिकाणी आहे. उमरगा व लोहारा या तालुक्यामध्ये शिवसेना व काँग्रेस हे प्रमुख पक्ष असतील तर त्यानंतर काही प्रमाणात राष्ट्रवादी व भाजप यांचेही बळ पाहायला मिळते. उस्मानाबाद तालुक्यामध्ये सर्वाधिक गट झाल्याने तिथे गटाची रचनाही मोठ्या प्रमाणात बदलल्याचे दिसुन येत आहे. अनेक गटाचे अस्तित्व संपले असुन वडगाव (सि.), क.तडवळा, अंबेजवळगा, पळसप हे अगोदरचे गट आता राहिलेले नाहीत.

Osmanabad Zilla Parishad
इतर राज्यांचे मुख्यमंत्री रडताना पाहिलेत का? मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना सवाल

नव्या गटात जागजी, सारोळा (बु.), आळणी, येडशी, कारी व करजखेडा यांचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वीच्या गटातील पाडोळी, बेंबळी, कोंड यामध्ये फारसा बदल झालेला दिसत नाही. एखाद दुसऱ्या गावाचा अपवाद वगळता गट पुन्हा त्याच प्रकारे अस्तित्वात असणार आहे. तीन तालुक्यावरच जिल्हा परिषदेच्या सत्तेपर्यंत जाण्याचा मार्ग असणार आहे. उस्मानाबाद, तुळजापुर व कळंब या तीन तालुक्याची संख्या ३३ इतकी आहे. त्यामुळे या ठिकाणी ज्यांना अधिक जागा त्या पक्षाला सत्तेपर्यंत जाण्यात फारशी अडचण भासणार नसल्याचे चित्र आहे. लोहारा व उमरगा येथे १४ जागा तसेच भुम, परंडा, वाशी या तीन तालुक्यांमध्ये १४ जागा आहेत. येथेही अधिकच्या जागा जिंकण्यासाठी पक्षीय पातळीवर चांगलाच संघर्ष पाहायला मिळणार आहे. प्रारुप प्रभाग रचनेवर आठ तारखेपर्यंत हरकती व आक्षेप घेता येणार आहे.

Osmanabad Zilla Parishad
राष्ट्रवादी सोबत शपथ घेताना भाजपने हिंदुत्वाचा विचार कुठे ठेवलेला?

तालुकानिहाय गटसंख्या

उस्मानाबाद - १४

तुळजापुर - १०

कळंब - ०९

उमरगा - ०९

परंडा - ०६

भुम- ०५

लोहारा - ०५

वाशी - ०३

------------------------

एकुण ६१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.