Sharad Pawar: ...अन्यथा सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांवर कारवाई करणार! शरद पवारांचा इशारा

राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला असून अजित पवार सरकारमध्ये सामिल झाले आहेत.
Sharad Pawar statement Traders should take positive stand regarding market yard migration
Sharad Pawar statement Traders should take positive stand regarding market yard migration esakal
Updated on

मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला असून अजित पवार सरकारमध्ये सामिल झाले आहेत. यामध्ये जवळपास ३५ आमदार अजित पवारांसोबत गेले आहेत. यामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचाही समावेश आहे. त्यामुळं शरद पवारांनी आता तटकरे आणि पटेल यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. (Otherwise action will be taken against Sunil Tatkare Praful Patel Sharad Pawar warning)

Sharad Pawar statement Traders should take positive stand regarding market yard migration
Maharashtra Politcs: महाराष्ट्राच्या राजकारणावर पटोलेंनी मांडली काँग्रेसची भूमिका! म्हणाले...

पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचा मी अध्यक्ष आहे आणि मी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये पक्षाच्या सरचिटणीसपदी सुनील तटकरे यांची तर पक्षाच्या सरचिटणीसपदी प्रफुल पटेल यांची नियुक्ती केली होती. त्यामुळं आता या दोघांनी मला रितसर लिहून द्यावं किंवा मला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल.

Sharad Pawar statement Traders should take positive stand regarding market yard migration
Maharashtra Politcs: महाराष्ट्राच्या राजकारणावर पटोलेंनी मांडली काँग्रेसची भूमिका! म्हणाले...

माझी नाराजी कोणावर नाही, पण...

माझी नाराजी कोणावर नाही पण प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची मी सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली होती. पण सरचिटणीसांसाठी पक्षाची नियमावली बंधनकारक असते त्याचं उल्लंघन करुन त्यांनी कृती केली आहे. त्यामुळं आता त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही. ही गोष्ट त्यांनी स्वतः समजायला पाहिजे तसेच त्यांनी पुढं जायचं की नाही हे ठरवायला पाहिजे, अशा शब्दांत शरद पवारांनी स्पष्ट भूमिका मांडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.