Ajit Pawar: आमचाच माजी आमदार फुटला, आम्ही कशाला गर्दी जमवू? अजित पवार असं का म्हणाले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने उद्धव ठाकरे यांनी सभेला गर्दी जमवल्याची सत्ताधाऱ्यांची टीका
 Ajit Pawar
Ajit Pawar Sakal
Updated on

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या जाहीर सभेमुळे कोकणातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं. उद्धव ठाकरे यांच्या या सभेला तुफान गर्दी जमली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने उद्धव ठाकरे यांनी सभेला गर्दी जमवली, अशी खोचक टीका सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

आता या टिकेला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या खास अंदाजात उत्तर दिलं आहे. ते अहमदनगरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. सत्ताधाऱ्यांच्या खोचक टीकेवर अजित पवार म्हणाले की, आमचाच माजी आमदार संजय कदम फुटला. खेडच्या उद्धव ठाकरे यांच्या त्या सभेत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आम्ही कशाला गर्दी जमवू?, असं उत्तर देत असताना अजित पवार मिश्किलपणे हसल्याचं दिसून आलं.

त्याचबरोबर राज्यात अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस, कांदा, सोयाबीन, द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी प्रचंड हवालदिल झाला असतानाच त्याला आधार देणं हे राज्य सरकारचे काम आहे. या सरकारला काही चांगले सांगायला गेलो, तरी राग येतो अशी टीकाही अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

 Ajit Pawar
Priyanka Gandhi : प्रियांका गांधींची डोकेदुखी वाढली; बिग बॉस फेम अर्चनाचा पीएवर गंभीर आरोप

तर यावेळी बोलताना अजित पवारांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरतीही भाष्य केलं आहे. "बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि आयुष्यभर जपलेलं धनुष्यबाण निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना न देता एकनाथ शिंदे यांना दिलं. महाराष्ट्राच्या जनतेला हे बिल्कुल आवडलेलं नाही. उद्धव ठाकरेंची खेडची सभा आठवा. विरोधक आता म्हणत आहेत की त्या सभेत आमची (राष्ट्रवादीची) माणसं होती. पण आमचाच माजी आमदार फुटला, आम्ही कशाला गर्दी जमवू?" असंही पवार पुढे म्हणालेत.

तर उद्धव ठाकरे यांच्या खेडच्या सभेत राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी घड्याळाची साथ सोडत शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला. रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांच्या विरोधात संजय कदम पुढील विधानसभेची निवडणूक लढतील. खेडच्या सभेत बोलताना योगेश कदम यांचा पराभव करु, अशी शपथच संजय कदम यांनी घेतली आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी जमल्यामुळेही ही सभा चर्चेचा विषय ठरली आहे.

 Ajit Pawar
Pankaja Munde: "भाजप पक्षाने पंकजा मुंडेसह अनेक नेत्यांना वापरून बाजूला केलं"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.