Monsoon Session: आमचं 'वर्क फ्रॉम होम' नाही, आम्ही रस्त्यावर उतरून काम करतो; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

आम्ही दिखाव्याचे काम करत नाही, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे
Monsoon Session
Monsoon SessionEsakal
Updated on

CM Eknath Shinde News : मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील लाखो हेक्टर शेतीही पाण्याखाली गेली आहे. राज्यात पावसाने थैमान घातलं आहे. जवळपास 16 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाले आहेत. पुरात अडकलेल्या तसेच पावसामुळे नुकसान झालेल्या सर्वसामान्य व शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने काय पावले उचलली? यावरून विरोधकांनी केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिली आहेत.

'राज्यातील पूरस्थितीवर सरकार लक्ष ठेवून आहे. पूरग्रस्त व शेतकऱ्यांना सरकार मदत करेल. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही', अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. तर यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशार्ळवाडीतील मदतीवरही भाष्य केलं आहे. आम्ही दिखावा करत नाही इशार्ळवाडीत लोकांना मदत केली. आता त्यांना सिडको कायमस्वरूपी घर बांधून देणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

Monsoon Session
Manipur Violence: 'PM मोदी अजूनही झोपेतच!' मणिपूर घटनेमुळे व्यथित झालेल्या भाजपा नेत्याचा भाजपला रामराम

तर शिंदेंनी यावेळी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लक्ष केलं आहे. आम्ही इशार्ळवाडीला दिखाव्यासाठी गेलो नाही. आमचं सरकार वर्क फ्रॉम होम नाही, आम्ही रस्त्यावर उतरून काम करतो. काही लोक व्हॅनिटी व्हॅनमध्ये आले. तर काही लोक चिखल तुडवत गेले. फक्त देखावा करण्यासाठी आम्ही काम करत नाही आणि करणारही नाही. माझं सरकार, माझी जबाबदारी एवढ्यापुरतं आमचं सरकार नाही आम्ही प्रत्यक्ष कृती करणारे आहोत असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Monsoon Session
Rohit Pawar: 'चिन्ह राहिलं नाही तरी…', निवडणूक आयोगाच्या नोटीशीनंतर घड्याळ चिन्हाबाबत रोहित पवाराचं मोठं वक्तव्य

तर आमचं सरकार वर्क फ्रॉम होम नाही, आम्ही रस्त्यावर उतरून काम करतो असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना टोला लगावला आहे. काही जण इशार्ळवाडीला व्हॅनिटी व्हॅन घेऊन गेले आणि फोटोसेशन करून आले. आम्ही दिखाव्याचे काम करत नाही, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

Monsoon Session
Manipur Violence: 'PM मोदी अजूनही झोपेतच!' मणिपूर घटनेमुळे व्यथित झालेल्या भाजपा नेत्याचा भाजपला रामराम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.