Maharashtra Politics: राष्ट्रवादीमधून आऊटगोइंग सुरूच! माजी मंत्र्यांची कन्या भाजपमध्ये जाणार

NCP News: नाशिकमध्ये शिवसेने पाठोपाठ आता राष्ट्रवादीलाही धक्का
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsEsakal
Updated on

Latest Marathi News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर पक्षांतराचे प्रमाण वाढले आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेत्यांचे शिंदेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

अशातच गेल्या काही दिवसांपासुन राजकारण ढवळुन निघालेल्या नाशिकच्या राजकारणातुन महत्वाची बातमी समोर येत असून आज माजी खासदार वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीसह इतर लहान मोठ्या पक्षामधून भाजपमध्ये इनकमिंग वाढली आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

तर काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. मालेगाव मधील डॉ. अद्वय हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत (ठाकरे गटात) प्रवेश केला आहे.

Maharashtra Politics
Shinde vs Thackeray : “एकदा राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना हे न्यायालय... हरिश साळवेंचा जोरदार युक्तीवाद

त्यानंतर आता नाशिक जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून काम पाहिलेल्या माजी खासदार डॉ. वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे नाशिकमधून भाजपला आणखी बळ मिळणार आहे.

शिवाय आगामी निडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने चांगलीच खेळी खेळल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे.

Maharashtra Politics
Hasan Mushrif News: मुश्रीफांना हायकोर्टाचा दिलासा; पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश

अमृता पवार यांच्यासह काँग्रेसचे माजी मंत्री तथा माजी खासदार अनंतराव देशमुख आणि त्यांचे पुत्र नकुल देशमुख यांचा आज भाजपामध्ये प्रवेश होणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. एकीकडे भाजप-शिवसेनेत असलेली फूट आणि महाविकास आघाडीने केलेली एकजूट यामुळे आगामी लोकसभा निवडणूक चुरशीची होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()