P. L. Deshpande Death Anniversary: असा अवलिया पुन्हा होणे नाही…

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबई येथे झाला.
पु.ल. देशपांडे
पु.ल. देशपांडेsakal
Updated on

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे मराठी भाषेतील एक सुप्रसिद्ध साहित्यिक ,नाटककार, विनोदकार, अभिनेता, कथाकार आणि पटकथा लेखक, चित्रपट दिग्दर्शक आणि संगीतकार आणि गायक असं महाराष्ट्रातील लाडक व्यक्तिमत्व असणारा भन्नाट माणुस महाराष्ट्रात त्यांना पु. ल. असे म्हणतात. (P. L. Deshpande Death Anniversary)

कला क्षेत्रात त्यांना १९९०  मध्ये भारत पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासह पुण्यभूषण, महाराष्ट्र गौरव, पद्मश्री, साहित्य अकादमी सन्मान, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, महाराष्ट्र भूषण सन्मान, कालिदास सन्मान आदी अनेक सन्मानचिन्हांनी सजले होते.

पु.ल. देशपांडे
‘काही जणांनी शब्द पाळला नाही’ - संजय राऊत

पु.ल. देशपांडे यांनी महाराष्ट्र कला अकादमीची स्थापना केली. मराठीव्यतिरिक्त देशपांडे यांचे साहित्य इंग्रजी, कन्नड यासह अनेक भाषांमध्ये आहे. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबई येथे झाला. त्यांच्या आजोबांनी रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीचे मराठीत अनुवाद केले. त्यांचे प्रारंभिक शिक्षण मुंबईतील पार्ले टिळक शाळेतून झाले. हायस्कूलनंतर एलएलबीसाठी त्यांनी इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

१९५० मध्ये त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून एमएची पदवी प्राप्त केली. भास्कर संगीतालयाच्या दत्तोपान राजोपाध्याय कडून हार्मोनियम खेळण्याचे धडेही त्यांनी घेतले होते. त्यांची कीर्ती लेखक म्हणून असली तरी त्यांची गती या सर्व क्षेत्रात सारखी होती.

पु.ल. देशपांडे
"शालेय अभ्यासाची उजळणी | STD 9th Maths Know about Co-ordinate Geometry

'गुळाचा गणपती' या 'सबकुछ पु.ल.' म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जवळजवळ सर्वच पैलूंचे दर्शन होते.पुलंनी मराठी माणसाला काय दिले? तर त्याच्या रोजच्या जगण्यातील गमतीदार निरिक्षणे नेमकेपणाने पकडून त्याला हसायला शिकवले.

मुंबईत जन्मलेले पुलं पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकले. ४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी महाविद्यालयात शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. त्यांचे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील योगदान लक्षणीय आहे.

पु.ल. देशपांडे
‘काही जणांनी शब्द पाळला नाही’ - संजय राऊत

ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले. दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.

पुलंनी जवळपास 40 वेगवेगळी पुस्तके लिहिली. बटाट्याची चाळ, असा मी असा मी, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकांच्या तर 20 हून अधिक आवृत्या खपल्या. त्यांच्या लोकप्रियतेचे उदाहरण व साहित्याचा कस जोखण्याचे यापेक्षा कोणते वेगळे परिमाण असू शकते.

पु.ल. देशपांडे
'गद्दारी'च्या आरोपामुळे देवेंद्र भुयार नाराज; शरद पवारांशी करणार चर्चा

मराठी वाडमयाचा (गाळीव) इतिहास, खोगीरभरती, पुरचुंडी, नस्ती उठाठेव, गोळाबेरीज, हसवणूक ही त्यांची इतर विनोदी पुस्तकेही गाजली. त्यांच्या आवृत्त्यांचेही विक्रम झाले. त्यांची निरीक्षण शक्ती अफाट होती, हे त्यांनी लिहीलेल्या प्रवासवर्णनावरूनच कळेल. त्यांनी अमेरीका, युरोप, आशियातील अनेक देश पाहिले.

त्यात त्यांना प्रवासात आलेले अनुभव त्यांनी अतिशय गमतीदार पध्दतीने लिहिले आहेत. पूर्वरंग, अपूर्वाई, जावे त्यांच्या देशा , व्यंगचित्र आदी प्रवासवर्णने आहेत. त्यांची नाटकेही अतिशय गाजली. वार्‍यावरची वरात, तुझं आहे तुझपाशी, अमलदार, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, फुलराणी ही काही नाटके आहेत.

याशिवाय त्यांनी लिहिलेली काही व्यक्तिचित्रेही अजरामर ठरली आहेत. गणगोत, गुण गाईन आवडी, मैत्र, आपुलकी यात पुलंनी आपल्या सुह्रदांबद्दल लिहिले आहे. पुलंच्या नावावर काही चांगले अनुवाद आहेत. द ओल्ड मॅन अॅण्ड द सी या हेमिंग्वेच्या गाजलेल्या पुस्तकाचे एका कोळीयाने या नावाने पुलंनी केलेला अनुवाद निव्वळ अप्रतिम असा आहे.अशा या सर्वगुणसंपन्न व्यक्तीचे १२ जून २००० रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी पुण्यात प्रयाग रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.