P.L.Deshpande Birth Anniversary : महाराष्ट्राच्या सर्वमान्य दैवताची आज जयंती

पुलंना त्यांचे आजी आजोबा "पुरुषोत्तम" म्हणायचे
P.L.Deshpande Birth Anniversary
P.L.Deshpande Birth Anniversarysakal
Updated on

P.L.Deshpande Birth Anniversary : बहुदा अस म्हणायला काहीच हरकत नाही की पु.ल हे एकटे व्यक्तिमत्त्व आहे ज्यांच्या विषयी कोणीच टीका केली नाही. सगळ्यांनी त्यांना आपलं दैवत मानलं पण त्यात कधीच वाद झाले नाहीत.

P.L.Deshpande Birth Anniversary
Lata Mangeshkar Birth Anniversary : लता दीदी आई-वडिलांचे पाय धुऊन प्यायच्या पाणी

पुलंचा जन्म ०८ नोव्हेंबर १९९० ला झाला तो अधिक मास होता ह्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, यावरून त्यांचं नाव पुरुषोत्तम ठेवलं असावं. यावर पुल म्हणतात की काही लोक अधिक मासाला धोंड्या मासही म्हणतात, पण हे नाव माझ्या घरच्यांनी ठेवलं नाही.

P.L.Deshpande Birth Anniversary
Yash Chopra Birth Anniversary : यश चोप्रांच्या ‘या’ रोमँटिक चित्रपटांनी जागवले प्रेम

पुलंना त्यांचे आजी आजोबा "पुरुषोत्तम" म्हणायचे, लहान भावंड "भाई", मित्रांसाठी ते "पुर्ष्या" आणि एकटी आई "बाबुल" म्हणायच्या.. अवघ्या महाराष्ट्राने मात्र पु. ल. किंवा पी एल ही त्यांच्या नावाची आद्याक्षर नेहमीच घोळवली आणि ह्याच नावात महाराष्ट्राला मिळालं आपल्या हक्काचं आपल साहित्यिक आणि सांस्कृतिक दैवत.

P.L.Deshpande Birth Anniversary
Rajiv Gandhi Birth Anniversary: पापा आप हर पल साथ, मेरे दिल में हैं...राहुल गांधींनी शेअर केला भावनिक व्हिडिओ

पुलंच्या सगळ्याच साहित्याला लोकं खूप मनापासून वाचतात, मुळात प्रत्येकावर्गासाठी त्यांच्या आकलन शक्तीला समजणार पुलंनी लिहून ठेवलं आहे. पुलंची ख्याती सर्वदूर आहे, आत्ताच्या काळात खूप जास्त डोक्यावर घेतलेला एक कार्यक्रम म्हणजे "stand up comedy" पण हा सुरू केला पुलंनी.. एखादी गोष्ट सुरू करायची आणि ती गोष्ट मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांना ऐकवायची ही ताकद पुलंमध्येच होती..

P.L.Deshpande Birth Anniversary
Birth Anniversary: चंदनाचा एक हार अन् राजीव गांधींचा घात

जीवनाचे मार्मिक निरीक्षण, मनन व चिंतन, व्यापक सहानुभूती, अभिजात रसिकता आणि आपल्या भारतीय संस्कृतीविषयी विलक्षण आदर हा पु.ल देशपांडे यांच्या लेखनाचा मूलाधार, म्हणूनच आजही इतक्या वर्षानंतर त्यांचे लेखन मनाला भिडते.

P.L.Deshpande Birth Anniversary
Annabhau Sathe Birth Anniversary 2022 : बदललेल्या प्रश्‍नांसह शाहिरीही झाली हायटेक

पुलंनी जवळपास ४० वेगवेगळी पुस्तके लिहिली. बटाट्याची चाळ, असा मी असा मी, व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, पुरचुंडी, पुलकित, अघळपघळ, खोगीरभरती, पुरचुंडी, नस्ती उठाठेव, गोळाबेरीज, रसिक हो, हसवणूक ही त्यांची काही गाजलेली पुस्तके.

P.L.Deshpande Birth Anniversary
Birth Anniversary: ओशोंसाठी सोडलं कुटूंबाला, एकेकाळी होते सुपरस्टार

देशपांडे यांचे साहित्य मराठीशिवाय इंग्रजी, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. त्यांचे ती फुलराणी हे नाटक आजही लोकांच्या मनावर घर करून आहे, त्यातले मोनोलोग आजही लोकांना तोंडपाठ आहेत.

P.L.Deshpande Birth Anniversary
Birth Anniversary: जगाला शांततेचा संदेश देणार्‍या मदर तेरेसा

पु.ल.देशपांडे यांना १९९० मध्ये भारत सरकारने कला क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. यासोबतच पुण्यभूषण, महाराष्ट्र गौरव, पद्मश्री, साहित्य अकादमी सन्मान, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, महाराष्ट्र भूषण सन्मान, कालिदास सन्मान आदी अनेक सन्मानांनी सन्मानित करण्यात आले. २००२ मध्ये महाराष्ट्र शासनाने 'पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची स्थापना केली.

P.L.Deshpande Birth Anniversary
Birth Anniversary: जगाला शांततेचा संदेश देणार्‍या मदर तेरेसा

असा मी असामी मध्ये पुल म्हणतात की, कसा मी हे माझं मला नीटसं कळत नाही. पण ह्या जगात येताना जसा गपचुप आलो, तसा जाताना देखील आपल्या हातून त्या जगाला फारसा धक्का न लावता निघून जाण्याची इच्छा बाळगणारा असा मी एक असामी आहे. पण पुलंच्या जाण्याने आपल्याला खूप फरक पडला..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()