मोठी बातमी! पाकणी, हिवरे, चिखलीजवळील फॉरेस्टच्या जागेचा तिढा सुटला, समांतर जलवाहिनीचे काम सुरु; १ डिसेंबरपासून सोलापूर शहराचा ‘असा’ राहील पाणीपुरवठा

वन विभाग व राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या वादात अडकलेल्या सोलापूर महापालिकेच्या समांतर जलवाहिनीचे काम आता सहा महिन्यांनंतर सुरू झाले आहे. तत्पूर्वी, उजनी धरणाजवळील आढेगाव परिसरात थांबलेले काम देखील सध्या सुरू आहे.
Sakal Exclusive
Sakal Exclusivesakal
Updated on

सोलापूर : वन विभाग व राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या वादात अडकलेल्या सोलापूर महापालिकेच्या समांतर जलवाहिनीचे काम आता सहा महिन्यांनंतर सुरू झाले आहे. तत्पूर्वी, उजनी धरणाजवळील आढेगाव परिसरात थांबलेले काम देखील सध्या सुरू आहे. आता टेंभूर्णी बायपासजवळील मोजणी पूर्ण झाली असून बाधित १३ शेतकऱ्यांना मोबदला दिल्यावर तेही काम सुरू होईल. ३० नोव्हेंबरपर्यंत ११० किमी काम पूर्ण होईल, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुधारावा, पाच- सहा दिवसांआड होणारा पाणीपुरवठा एक-दोन दिवसाआड व्हावा, यादृष्टीने सध्या ८९२ कोटींची समांतर जलवाहिनी टाकली जात आहे. पण, टेंभूर्णी बायपासजवळ १८०० मीटर काम थांबले असून तेथील १३ शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीतून पाइपलाइन जाणार आहे. त्याची मोजणी पूर्ण झाली असून आता शेतकऱ्यांची बैठक घेवून त्यांना मोबदला दिला जाणार आहे. त्यानंतर त्या जागेतून पाइपलाइन टाकली जाईल.

तत्पूर्वी, धरणाजवळील तीन शेतकऱ्यांनी देखील मोबदल्याच्या कारणातून काम अडविले होते. पण, पोलिस बंदोबस्तात ते काम सुरु झाले आणि आता १० दिवसांत ते पूर्ण होईल. पाइपलाइनच्या कामातील सर्वात मोठा अडथळाही आता दूर झाला आहे. वन विभाग व राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या वादात थांबलेले काम आता सुरु झाले आहे. ऑक्टोबरअखेर पाकणी, चिखली व हिवरे येथील १२०० मीटरचे काम पूर्ण केले जाणार आहे.

१ डिसेंबरपासून पाइपलाइनचे ट्रायल होईल

जलवाहिनीचे काम ३० सप्टेंबरपूर्वीच पूर्ण होईल. टेंभूर्णी बायपासजवळील मोजणी पूर्ण झाली असून आता बाधितांना मोबदला देऊन तेही काम काही दिवसांत सुरू केले जाणार आहे. महापालिका आयुक्तांच्या नेतृत्वात सर्व अडथळे दूर होऊन समांतर जलवाहिनीचे काम वेळेत पूर्ण होत आहे. १ डिसेंबरपासून पाइपलाइनचे ट्रायल होईल आणि त्यानंतर शहराला आठवड्यातून दोन व तीन दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन आहे.

- व्यंकटेश चौबे, सार्वजनिक आरोग्य अभियंता, महापालिका, सोलापूर

सोलापूरकरांना दिवसांतून दोनदा पाणी

समांतर जलवाहिनी झाल्यावर सोलापूरकरांना सकाळी दोन तास आणि दुपारून पुन्हा तीन- साडेतीन तास पाणी सोडले जाणार आहे. जेणेकरून शेवटच्या टोकापर्यंत पुरेशा दाबाने पाणी पोचेल हा त्यामागील हेतू आहे. जलवाहिनीतून पाणी उपसा सुरू झाल्यावर प्रत्येक आठवड्यातील मंगळवारी आणि शनिवारी पाणी सोडले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.