पालघर बलात्काराच्या घटनेनं हादरलं आहे. ३२ वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चाकूचा धाक दाखवत महिलेवर सामुहिक अत्याचार करण्यात आला आहे. नालासोपाऱ्यातील संतोष भवन येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.