Ashadhi Wari : वारीतून मिळाला जगण्याचा ‘राजमार्ग’; उच्चशिक्षित युवकाची भावना

त्याचे प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागात तर उच्च शिक्षण बंगळूरला झाले. पण त्याची मायभूमी असलेल्या मराठवाड्याच्या दुर्गम भागाच्या विकासाचा ध्यास, त्याला शांत बसू देई ना.
sachin chaudhary
sachin chaudharysakal
Updated on

भंडीशेगाव - त्याचे प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागात तर उच्च शिक्षण बंगळूरला झाले. पण त्याची मायभूमी असलेल्या मराठवाड्याच्या दुर्गम भागाच्या विकासाचा ध्यास, त्याला शांत बसू देई ना. त्यासाठी त्याने फेलोशिप घेतली. पण त्यात मन रमत नव्हते. वारीची तारीख जाहीर झाली.

त्याने निर्धार पक्का केला आणि भगवद्भक्तीचा अभ्यास करण्यासाठी तो वारीत सहभागी झाला. ‘गरजा कमी असल्या की समाधानाने जगता येते’, याचा तो अनुभव घेतोय. ‘एकमेकांचा विचार करणारी ही भक्तीची चळवळ जगाला तारक आहे,’ याचा तो बोध घेतोय. त्याचे वय आहे अवघे २४ व नाव आहे सचिन चौधरी.

आषाढी वारीत प्रत्येक माणूस एका ध्येयाने प्रेरित होऊन चालत असतो. काही घरात परंपरेने वारी चालत आलेली असते, म्हणून येतात. काही एकदा तरी वारी करायची, या उद्देशाने वारीत येतात. तर काही उत्सुकतेपोटी वारीत येतात. काही पोटासाठी वारीला येतात.

असाच एक प्रसंग. पुरंदवडेत रिंगणाच्या वेळी समोरील मंगल कार्यालयात दुपारच्या विसाव्यासाठी एक तरुण थांबला. सचिन चौधरी त्याचे नाव. जालना जिल्ह्यातील माहोरा गावचा. तो प्रथमच वारीला आला होता.

एमएपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर एकलव्य फाउंडेशनच्या माध्यमातून आदिवासीबहुल भागातील मुलांसाठी तो काम करीत होता. त्यानंतर बंगळूरमधील `जॉय ऑफ गिव्हींग फाउंडेशन’ने दिलेल्या जनस्वराज्य यंग लिडरशीप प्रोग्रॅमच्या माध्यमातून बिहारमध्ये सहा महिन्यांची फेलोशिप करण्यासाठी तो गेला.

तेथे त्याला चांगला पगार होता, गाडी होती. राहायला बंगला होता. पण कामाचा ताण अधिक. अखेर महिनाभर आधी फेलोशिप सोडली अन् तो थेट वारीत पोचला.

मराठवाड्याबाबत भावनिकता

‘मराठवाड्याकडील दुर्लक्षाबाबत कायम वाईट वाटत होते. येथील व्यवस्था बदलण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, अशी मनात मनीषा बाळगली होती.

येथे अजूनही शिक्षण व्यवस्थेचे आणि मूलभूत विकासाचे बोजवारा उडाला आहे. एक एक रुपया जमा करून मुलांच्या संशोधनासाठी ग्रंथालय सुरू केली. पण काहीतरी करण्यासाठी काम करीत होतो. संयुक्त राष्ट्रात प्रबंध सादर करणार आहे. संधी मिळाल्यास तिकडे जाऊन मराठवाड्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहीन,’ असे सचिनने सांगितले.

sachin chaudhary
Ashadhi Ekadashi 2023 Date: आषाढी एकादशी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, तिथी आणि महत्व

भक्ती परंपरा चळवळ

वारी ही भक्तीपरंपरा आहे. यामध्ये समानता आहे. इथे चालताना कोणी गरीब-श्रीमंत नाही, सर्व एकाच मायेची लेकरे असल्याचा भाव असतो. सध्याच्या धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या काळात वारीतील समानता ही शब्दातीत आहे.

भक्तीमय वाटचाल

वारीत क्षेत्र कोणतेही असो, ते जगायचे कसे हे वारी शिकवते. त्याचे धडे वारीत चालताना मिळतात. फक्त ते वारीच्या वातावरणात समरस व्हावे लागते. म्हणूनच स्वतःच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी झगडण्याची आस ठेऊन चालणाऱ्या युवकाला वारीतील भक्ती चळवळीतून जीवनाचा सार सापडला.

प्रतिकूल परिस्थितीला जेव्हा अनुकूल बनविण्याची ताकद तुमच्यात निर्माण होते, तेव्हा कोणतेच यश तुमच्यापासून दूर जाऊ शकत नाही. जगण्यासाठी पन्नास हजारच पगार पाहिजे असे नाही, तर दहा हजारांतही तुम्ही समाधानी जीवन जगू शकता, हे वारीत शिकायला मिळाले.

सचिनसारखे असंख्य युवक या वारी अनुभवायला येतात आणि आत्मन्नतीचे सुख उपभोगून जातात. त्यांच्या जीवनाला आकार, दिशा देणारी ठरली. यामागील एकच कारण आहे, वारीतील सकारात्मकता आणि प्रेरणादायी, भक्तीमय वाटचाल.

sachin chaudhary
Ashadhi Ekadashi 2023: पंढरपुरात राजकीय नेत्यांचे नको, वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावा - मुख्यमंत्री

तरुणाई ॲक्टिव्ह

माझी आजी वारी करायची. गेल्यावर्षी माझ्या मित्रानेही वारी केली. त्याने वारी लयच भारी असल्याचा अनुभव सांगितला होता. त्यामुळे मी मागील वर्षीच वारी करायची असे ठरवले होते. वारीचे जगच वेगळे आहे. वारीच्या वाटेवर खूप मोठ्या प्रमाणात कम्युनिटी बिल्ट होते.

पहाटे चार वाजता टॅंकरखाली आंघोळ करायची आणि वारीच्या वाटेला लागायचे. नाष्ट्याची शिदोरी वाटून खायची. त्यामुळे इथल्या गरजाच कमी आहेत, साधी राहणी पण उच्च आचारसरणी वारीच्या वाटेवर असते. वारकऱ्यांना कोणताही मोठेपणा नाही. वारीत तरुणाई दिंडीतील व्यवस्थेचे काम पाहते, पहाटे दोन वाजल्यापासून तरुणाई झटते. मात्र, त्यातून त्यांना उत्साह दिसतो. तरुणाई सेवेकरी म्हणून काम करते. त्यामुळे वारीतील तरुणाई सक्रिय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()