सातारा : काेराेनाच्या संकट काळात महाराष्ट्र राज्यातील विधानमंडळाचे कामकाज अखंडित सुरु हाेते. अधिवेशन व्यवस्थित आणि सुरक्षित आयाेजित केले हाेते. विधिमंडळाची दाेन्ही सभागृह आजपर्यंत आदशर्वत राहिल्याची माहिती विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (ramraje naik nimbalkar) यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (om birla) यांना दिली. कोरोना प्रभावाच्या परिस्थितीनुसार विधिमंडळाचे कामकाज अधिक प्रभावीपणे आणि प्रवाही करण्याच्या उद्देशाने आॅनलाईन बैठकीचे आयोजन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले हाेते. त्यावेळी रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अधिवेशन कार्यकाळात गत वर्षात घेण्यात आल्याची माहिती दिली. (panchayat-to-parliament-public-representatives-meeting-om-birla-ramraje-naik-nimbalkar-maharashtra-assembly)
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली देशातील सर्व पीठासीन अधिकारी, विधिमंडळ सदस्य यांची आॅनलाईन बैठकी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महाराष्ट्राच्या विधिमंडाळाच्या दाेन्ही सभागृहाची माहिती विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली. राज्यातील विधिमंडाळाच्या दाेन्ही सभागृहाचे कामकाज अद्याप खंडीत झालेला नाही असे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र राज्यातील विधानमंडळ हे आजपर्यंत आदशर्वत राहिल्याचे सांगितले. ज्येष्ठ सदस्यांची संख्या जरी कमी होत असली तरीही वादविवाद आणि चर्चा यांची गुणवत्ता टिकून असल्याचे दिसत आहे. यापूर्वीच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि लोकाभिमुख असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. याचबरोबर ते जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. डिजिटल ग्रंथालयाचे काम सुरू असल्याची माहितीही सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी काेविड 19 काळात विधिमंडळाच्या कामकाजाविषयी आणि झालेल्या कार्याची माहिती दिली. दोन्ही सभागृहात आसनव्यवस्थेत सामाजिक अंतराचे भान ठेवून करण्यात आलेले बदल, यु.व्ही. प्रोटेक्शन, ओझोन प्रोटेक्शन, सरफेस कोटिंग सारखे प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व राज्यांच्या विधानसभा आणि विधानपरिषदांमधील कार्यवाहीचे थेट प्रसारण सोशल मीडियाद्वारे किंवा अन्य माध्यमांतून केले जात आहे ही आनंदाची बाब आहे असल्याची भावना व्यक्त करुन सर्व पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहाचे कामकाज सुरक्षितरित्या पार पाडले याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच, नवनिर्वाचित अध्यक्षांचेही त्यांनी अभिनंदन केले. याचबरोबर त्यांनी लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाजाची माहितीही दिली. संसदीय लोकतंत्र अधिक प्रभावी आणि सशक्त करण्यासाठी सर्व पीठासीन अधिकाऱ्यांनी असेच कार्य करत रहावे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, पाँडेचरी, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, कनार्टक, तामिळनाडू, बिहार, मध्यप्रदेश आदींसह सुमारे 13 विविध राज्यातील विधानपरिषदेचे सभापती, उपसभापती, विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी बैठकीत सहभागी होऊन, राज्यातील विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.