आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिरपूर तालुक्यातील बाळदे येथे प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी रिघ बघावयास मिळत आहे. या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त यात्रेचे आयोजन दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील करण्यात आले
आषाढी एकादशीनिमित्तर नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकर यांनी पंढरपुरात जाऊन विठ्ठल-रुक्मिणीचे सपत्नीक दर्शन घेतलं आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांचा विजय झालाय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे विद्यालयात अवतरली पंढरी. वारीत विद्यार्थ्यांनी विठोबा-रखुमाईसह संत आणि वारकऱ्यांची वेशभूषा करुन सादरीकरण केलं.
विदर्भाचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर जिल्ह्यातील स्वयंभू श्री विठ्ठल रुखमींनी देवस्थान इथं दर्शनासाठी भाविकांची गर्दी
कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिपंढरपूर असणाऱ्या नंदवाळ इथं आषाढी एकादशीनिमित्त मोठी यात्रा आयोजित केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यात कासार्डे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी आणि शिक्षकांकडून पालखी आणि रिंगण सोहळ्याचं सादरीकऱण.
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी १०३ कोटी रुपयांचा निधी देण्याची मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषणा केली आहे.
अकोला शहरातल्या ३२० वर्ष पुरातन असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज पहाटे महापुजा संपन्न झाली. आषाढी एकादशी निमित्त आयोजित भव्य यात्रेला पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी केली आहे.
आषाढी एकादशी निमित्त रोज रेल्वेने प्रवास करणारे वारकरी मंडळाने देखील आज चर्चगेट रेल्वे स्थानकांवर विठुरायाचा गजर करत आषाढी एकादशी साजरा करण्यात आली
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त नागपूरमधल्या सुभाष नगर इथल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या आतील भागाला फुलांनी सजावट. टाळ-मृदुंगाच्या गजरात भाविक भजन किर्तनात तल्लीन.
आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातील विठ्ठल मंदिरांमध्ये भक्तांची रिघ पाहायला मिळत आहे. कल्याणमधील एका मॅकॅनिकल इंजिनिअरनं अनोख्या पद्धतीनं आषाढी एकादशी साजरी केली आहे. आषाढी एकादशीचं औचित्य साधत कल्याणमधील दिनेश गुप्ता यांनी 1111 बोटाचे ठसे उमटवत विठ्ठलाचे चित्र साकारले असून यात विविध रंगाचा देखील वापर केला आहे. दिनेश गुप्ता यांनी साकारलेलं विठ्ठलाचं गोड रुप पाहून अनेकजण भारावून जात आहेत.
"आम्ही दरवर्षी विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी गाडीवर येतो. दर्शन घेतल्यानंतर निघून जातो. यंदाही देवाचे दर्शन घ्यायचं आणि घरी निघून जायचं, असं आम्ही ठरवलं होतं. पण आम्हाला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत विठुरायाची शासकीय पूजा करण्याचा मान मिळाला. आम्ही या गोष्टीचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. गेल्या १६ वर्षांपासून आम्ही पंढरपूरची वारी करीत आहोत. विठुरायाच्या महापुजेचा मान मिळाल्याने आमचे जीवन सार्थक झाले आहे", अशी प्रतिक्रिया बाळू अहिरे आणि आशाबाई अहिरे यांनी दिली.
राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहे. त्यामुळे महिला वर्गात आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान, लाडक्या बहिणीसारखीच लाडक्या भावांसाठीही अशीच योजना सुरु करण्यात यावी, अशी मागणी तरुणवर्गाकडून केली जात होती. हीच बाब लक्षात घेता मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठी घोषणा केली.
नवी दिल्ली : आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रात आज आनंदाच वातावरण पाहायला मिळतंय. ज्ञानोबा-तुकाराम म्हणत लाखो वारकरी आज पंढरपुरात दाखल झाले आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या बाहेर राजधानी नवी दिल्लीत देखील वारीचा उत्साह पाहायला मिळतोय. राजधानी नवी दिल्लीत मराठी प्रतिष्ठानच्या वतीने मागच्या अनेक वर्षांपासून वारीचे आयोजन केले जातेय. नवी दिल्लीतील हनुमान मंदिरापासून सांकेतिक दिंडीला सुरुवात झाली असून आर.के पूरमच्या विठ्ठल मंदिरात या दिंडीची सांगता होणार आहे. मोठ्या उत्साहात दिल्लीकर भाविक वारीत सहभागी झाले आहेत. नवी दिल्लीच्या नवनिर्वाचित खासदार बंसुरी स्वराज देखील वारीत सहभागी झाल्या आहेत. फुगडी खेळत विठूनामाच्या गजरात हे वारकरी विठ्ठल मंदिराकडे निघाले आहेत. खासदार मनोज तिवारी देखील वारीत सहभागी झाले आहेत.
पंढरपूर : खांद्यावरील भगव्या पताका उंचावत.. टाळ-मृदंगाचा गजर... अन् हरिनामाचा जयघोष करीत तब्बल सतरा-अठरा दिवसांची पायी वाटचाल करुन आलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह सकल संतांच्या पालख्या भूवैकुंठ असलेल्या पंढरीत दाखल झाल्या. विठुरायाचे गोडवे गात आलेल्या वैष्णवांचे पंढरपूरवासीयांनी रांगोळ्याच्या पायघड्या आणि भव्य स्वागत कमानींनी शाही स्वागत केले.
सोलापूर : श्री क्षेत्र पंढरपूर येथे एस.टी. महामंडळाच्या जागेवर राज्यातील पहिले ३४ फलाटाचे चंद्रभागा यात्रा बसस्थानक व त्याला जोडूनच एक हजार यात्रेकरू एकावेळी राहतील, असे यात्री निवास बांधण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण आषाढी एकादशीच्या दिवशी आज (ता. १७) सकाळी १० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
'पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी' या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व लोक कलावंतांना आणि मान्यवरांना गौरविण्यात आले. यावेळी वारकऱ्यांसह मुख्यमंत्री शिंदे यांनी फेर धरला, तसेच शिंदेंनी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह फुगडी देखील घातली. इथे क्लिक करा
सध्या विठ्ठल दर्शनासाठी 17 ते 18 तास लागतात. टोकन दर्शनाची व्यवस्था सुरू झाल्यानंतर भाविकांना केवळ दोन तासांमध्ये लाडक्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन मिळणार आहे. तिरुपती बालाजीच्या धर्तीवर टोकन दर्शन व्यवस्था सुरू होणार असल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर (Gahininath Maharaj Ausekar) यांनी आज 'सकाळ'शी बोलताना दिली. इथे क्लिक करा
पंढरपूर : पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना विठुरायाचे सुलभ आणि कमीत कमी वेळेत पदस्पर्श दर्शन घेता यावे, यासाठी तिरुपती बालाजीच्या (Tirupati Balaji) धर्तीवर पंढरपुरात टोकन दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येईल. यासाठी राज्य सरकारकडून 103 कोटी रुपयांचा निधी लवकरच दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज पंढरपुरात केली. इथे क्लिक करा
पंढरपूर : राज्यात भरपूर पाऊस पाणी पडू दे, माझा शेतकरी सुखी-समाधानी राहू दे, असं साकडं आपण विठ्ठल चरणी घातल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले. आज आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) निमित्ताने पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. इथे क्लिक करा
सोलापूर : शिक्षण विभागाने वारी साक्षरतेची अंतर्गत जनजागरणासाठी आषाढी एकादशी दिवशी बुधवारी (ता. १७) लाईव्ह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळी १० ते दुपारी एक या वेळेत जिल्हास्तरावर मोहोळ पंचायत समितीचे कलापथक तर दुपारी एक ते तीन या वेळेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषेदेचे पथक हा कार्यक्रम सादर करणार असून सोशल मीडियावर त्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी केले आहे.
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा केली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे असं संपूर्ण कुटुंब उपस्थित आहेत. विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि मानाचे वारकरी अहिरे दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. इथं रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक घालून पूजा करण्यात आली. इथे क्लिक करा
सोलापूर : वातावरणातील बदलामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी 'एक वारकरी एक झाड' ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा सर्वांनी संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी' या आळंदी ते पंढरपूर पायी वारीच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, वातावरणात झालेल्या बदलामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने 'पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी' हा उपक्रम गेल्या १४ वर्षापासून राबविण्यात येत असून याला एक आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.
आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी आज लाखो भाविक पंढरपुरामध्ये दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच चंद्रभागेच्या स्नानासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. दरम्यान, पश्चिम द्वारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने रेटारेटी सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी विठ्ठल मंदिरात दाखल झाले असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजेला सुरुवात झाली आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यासह अनेक मंत्री-खासदार देखील महापूजेसाठी उपस्थित आहेत. इथे क्लिक करा
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात दाखल झाले आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या सोबत महापूजा करण्याचा मान नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे या भाविकाला मिळाला आहे. इथे क्लिक करा
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी (ता. १६) रात्री पंढरपुरात आल्यानंतर होलार समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांची एकच धांदल उडाली. मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवल्यामुळे प्रबोधनकार ठाकरे चौकात एकच गोंधळ उडाला. इथे क्लिक करा
Pandharpur Ashadhi Ekadashi Marathi News live Updates : आषाढी एकादशीनिमित्त दहा लाखाहून अधिक वैष्णवांचा मेळा पंढरीत दाखल झाला आहे. श्री विठ्ठलाच्या चरणस्पर्श दर्शनासाठी जवळपास 20 ते 22 तास, तर मुखदर्शनासाठी दोन ते तीन तासांचा अवधी लागत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्यांच्या हस्ते मंदिरात महापूजा संपन्न होणार आहे. दरम्यान, आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाला परिधान केला जाणारा खास पोषाख मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कुटुंबीयांकडून अर्पण केला असून मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी या पोशाखाचा स्वीकार केला. यासह आषाढी वारी आणि पंढरपुरातील महत्त्वाच्या या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.