Pandharpur Wari : 'या' तारखेपासून पंढरपुरात पांडुरंगाचं २४ तास दर्शन; मंदिर व्यवस्थापन समितीची माहिती

Aashadhi Wari : आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहू येथून संत तुकाराम महाराज पालखीमध्ये सहभागी भाविकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी एफडीए सज्ज आहे. पालखी मार्गावर 12 ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Aashadhi Wari
Aashadhi Wariesakal
Updated on

Aashadhi Wari : महाराष्ट्रातील मानाच्या दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. १७ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्यापूर्वी पांडुरंगाच्या दर्शनासाठी २४ तास मुभा देण्यात येणार आहे. मंदिर व्यवस्थापन समितीने याबाबतची माहिती दिली.

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरमध्ये येत्या ७ जुलैपासून विठ्ठल-रूक्मिणी मातेचे दर्शन २४ तास सुरू राहणार आहे. मंदिर समितीने याबाबतची माहिती माध्यमांना दिली. आषाढी एकादशीच्या दिवशी शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे. वारी सुखरुप पार पडावी, यासाठी राज्य सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

Aashadhi Wari
Jaydatta Kshirsagar : जयदत्त क्षीरसागर खरंच शरद पवारांच्या संपर्कात आहेत?, संदीप क्षीरसागरांनी थेटच सांगून टाकलं

आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहू येथून संत तुकाराम महाराज पालखीमध्ये सहभागी भाविकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी एफडीए सज्ज आहे. पालखी मार्गावर 12 ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA)देहू आणि आळंदी येथून निघणाऱ्या आषाढी वारी मार्गावर कडक अन्न तपासणी उपाययोजना राबवेल.

यासाठी पाण्याच्या बाटल्या, प्रसाद आणि तळलेले खाद्यपदार्थ यांची तपासणी करण्यासाठी एक टीम तैनात करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा मानकांचे पालन सुनिश्चित करून FDA नोडल प्राधिकरण म्हणून काम करेल. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे एफडीएचे सहआयुक्त सुरेश अन्नापुरे यांनी सांगितले आहे.

Aashadhi Wari
Bigg Boss OTT Season 3 : अरमान करतोय दोन्ही बायकांमध्ये भेदभाव ? पायलला सोडून कृतिकाबरोबर अरमानचा रोमान्स ; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या २८ जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर देहू नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणावर असलेली जलपर्णी काढण्यात आलेली आहे. पालखी प्रस्थान सोहळा व्यवस्थित पार पडावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध नगर परिषदांचे दोन अधिकारी आणि नऊ कर्मचारी असे एकूण ११ कर्मचारी आठवडाभर देहू नगरपंचायतकडे वर्ग करण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.