Pankaja Munde: "विधानसभेसाठी मास्टरप्लॅन तयार," आमदार झाल्यानंतर महायुतीसाठी पंकजांंची बॅटिंग

Vidhan Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षांना सोबत घेत महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवूनही भाजपला जबरदस्त धक्का बसला होता.
Pankaja Munde BJP Plan For Maharashtra Vidhan Sabha Election 2024
Pankaja Munde BJP Plan For Maharashtra Vidhan Sabha Election 2024Esakal
Updated on

राज्यात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने सविस्तर रणनीती तयार केली आहे, असे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकतेच सांगितले. त्यांनी मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत जास्तीत जास्त जागा जिंकण्याची रणनीती आखली आहे.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पंकजा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, गेल्या दोन दिवसांत विधानसभेच्या सर्व 288 जागांवर व्यापक चर्चा झाली. कोअर कमिटीने 21 जुलै रोजी पुण्यात होणाऱ्या राज्य भाजपच्या परिषदेत उपस्थित करायच्या मुद्द्यांवरही चर्चा केली, जिथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अमित शहा पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करतील."

लोकसभेत पराभव, विधान परिषदेतून विधी मंडळात एन्ट्री

दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. यावेळी बीडमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे यांनी विजय मिळवत ते जायन्ट किलर ठरले होते.

दुसरीकडे पंकजा यांच्यासाठी हा मोठा धक्का होता कारण बालेकिल्ल्यातच त्यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला होता. अशात या महिन्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीत पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली आणि तब्बल 4 वर्षांनी त्या पुन्हा विधी मंडळात पोहचल्या.

Pankaja Munde BJP Plan For Maharashtra Vidhan Sabha Election 2024
Nationalist Congress Party : ‘तुतारी’, ‘बिगुल’ गोठवले

भाजपचा सावध पावित्रा

एप्रिल-मे महिन्यात राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षांना सोबत घेत महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवूनही भाजपला जबरदस्त धक्का बसला होता. गेल्या निवडणुकीत 23 जागा जिंकणाऱ्या भाजपची यंदा अवघ्या 9 जगांवर घसरण झाली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा दमदार कामगिरी करत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी पक्षाकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेत बैठकांचा धडाका सुरू आहे.

Pankaja Munde BJP Plan For Maharashtra Vidhan Sabha Election 2024
K. C. Venugopal : महाराष्ट्रातील जनता भ्रष्ट सरकारला खेचेल;के. सी. वेणुगोपाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.