Pankaja-Dhananjay : भाऊ-बहिणीच्या नात्याचं नवं पर्व; पंकजांसाठी धनंजय मुंडे एक पाऊल मागे, भविष्यात...

pankaja munde dhananjay munde
pankaja munde dhananjay munde esakal
Updated on

बीडः बीड जिल्ह्याचं राजकारण भल्याभल्यांना कळत नाही म्हणतात. त्याचं कारण स्व. गोपीनाथराव मुंडे यांची जादूची कांडी. गोपीनाथरावांनी आपल्या हयातील कुणालाच कायमचा विरोधक मानला नाही. भल्याभल्यांना आपल्या तंबूत सामिल करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती.

परंतु गोपीनाथराव मुंडेंच्या निधनानंतर मुंडे कुटुंब एकत्र येण्याऐवजी दुरावत गेलं. धनंजय मुंडे कायम कुटुंब एक ठेवण्याच्या भूमिकेत होते. मात्र पंकजा मुंडेंकडून त्यांना कधीच साथ मिळाली नाही. आज मात्र बीड जिल्ह्यामध्ये वेगळं चित्र बघायला मिळत आहे.

pankaja munde dhananjay munde
Shivsena Video : 'गुवाहाटी'ऐवजी अयोध्येत होणार होतं बंड; आदित्य ठाकरेंसोबत गेलेल्या आमदारांना तिथेच...

स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामुळे मुंडे बहीण-भावाच्या नात्यात ओलावा निर्माण झाला आहे. बहिणीसाठी धनंजय मुंडे यांनी एक पाऊल मागे घेत कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली.

संचालकांच्या २१ जागांसाठी धनंजय मुंडे गटाकडून १० तर पंकजा मुंडे यांच्या गटाकडून ११ उमेदवार रिंगणात होते. लढत चुरशीची होईल, असं वाटत होतं. परंतु निवड बिनविरोध झाली आणि पंकजा मुंडे ह्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या. महत्त्वाचं म्हणजे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी धनंजय मुंडे गटाचे चंद्रकांत कराड यांची निवड करण्यात आलेली आहे.

pankaja munde dhananjay munde
Ajit Pawar: राज्यातील धरणं भरलेली नाहीत यावर बोला - अजित पवार

आज सकाळी ११ वाजता कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आलेली होती. पंकजा मुंडे यांचा अर्ज अध्यक्षपदासाठी आलेला होता. विरोधात अर्ज न आल्याने त्यांची निवड जाहीर करण्यात आली. तर धनंजय मुंडे गटाचे चंद्रकांत कराड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.

बहिणीसाठी धनंजय मुंडे एक पाऊल मागे आल्याचं दिसून येत आहे. २०१४मध्ये परळी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांचा पराभव झाला होता. पंकजा मुंडे मोठ्या फरकाने विजयी झाल्या. त्या पुढे राज्यात महत्त्वाच्या खात्याच्या मंत्रीदेखील झाल्या.

२०१९मध्ये मात्र परिस्थिती बदलली. राष्ट्रवादीने विधान परिषद आणि विरोधी पक्षनेतेपद देऊन ताकद दिलेल्या धनंजय मुंडे यांनी बळ दाखवलं आणि पंकजांचा पराभव केला. पराभवानंतर पंकजा मुंडेंना पक्षाकडूनही बळ मिळालं नाही. त्यांना विधान परिषदेवर संधी मिळेल, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. मात्र भाजपने त्यांना संधी दिली नाही. आज मात्र बहीण-भावाच्या नात्यात ओलावा निर्माण झाल्याने भविष्यात वेगळं चित्र निर्माण होऊ शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.