'पंकजा ताई, महादेव जानकर मेला तरी तुला सोडत नाही!'

MLA Mahadev Jankar
MLA Mahadev Jankaresakal
Updated on

बीड : दसऱ्यानिमित्त भगवान गडावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल दोन वर्षानंतर हा दसरा मेळावा साजरा केला जातोय. पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान गडावरील १२ एकर परिसरात पार पडत आहे. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात मुंडे भगिनींचं तोंडभरुन कौतुक केलं. तसेच त्यांच्यामागे मनापासून उभं राहणार, असं ठामपणे सांगितलं.

MLA Mahadev Jankar
हिंदूस्थान म्हणजे निर्लज्ज लोकांचा देश, संभाजी भिडेंचा तोल ढासळला

ते म्हणाले की, सत्ता स्वत:हून आमच्या डोक्यावर पळून येईल. तुमची ताकद हीच आमची युक्ती आहे. आम्ही गद्दार होणार नाही, लाचार होणार नाही. पंकजा ताई, प्रीतम ताई, महादेव जानकर मेला तरी तुला सोडत नाही. गोपीनाथ मुंडेनं 31 मेला माझ्या कानात कुर्र्र केलंय...

पुढे त्यांनी म्हटलंय की, पंकजा मुंडे ही आपला नेता आहे. नेता ओरिजिनल असावं लागतं. रक्ताचं असावं लागतं. भाषण करायला आरशासमोर उभं राहून नेता बनत नाही. हा आजचा कोणत्या पक्षाचा कार्यक्रम नाही. हे भगवान बाबांचं सेलिब्रेशन आहे. भगवान बाबा वंजाऱ्यांचा नव्हता. तो सगळ्या जाती धर्माचा होता. गोपीनात मुंडेला जात नव्हती. गोपीनाथ मुंडे नसता तर महादेव जानकर मेंढरं राखत बसला असता. देशात तिसरा आलेला इंजिनिअर आहे मी...

MLA Mahadev Jankar
2024 नंतर शिवसेना राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी; सीमोल्लंघनाचे राऊतांचे संकेत

पुढे ते पंकजा मुंडेंना उद्देशून म्हणाले की, या भावानं तुला ओवाळलंय. तुम्ही सर्वांनी मिळून खासदार प्रीतम ताईंच्या मागे उभं राहणार की नाही? पंकजा ताईंच्या मागे उभं राहणार की नाही? माझी पक्ष उत्तर प्रदेशातही चांगलं काम करतोय, तिथंही तू खासदार बनशील.

पंकजा ताई आपली आई आहे. बहुजन समाजाला कळकळीची विनंती आहे. इंतजार का फल मीठा होता है. माझी तुम्हाला विनंती आहे, आपला नेता कोण आहे, हे ओळखायल शिका. ओबीसीचं का ओ जनगणना करत नाही? जनगणनेशिवाय जात सुधारणार नाही. ओबीसी नेत्यांच्या पाठीमागे मनापासून उभं रहाल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.