Pankaja Munde: पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर? नाना पटोलेंच्या विधानामुळं चर्चांना उधाण

भाजपत नाराज असलेल्या पंकजा मुंडे सध्या चांगल्याच चर्चेत आहेत.
Pankaja Munde_Nana Patole
Pankaja Munde_Nana Patole
Updated on

मुंबई : भाजपत नाराज असलेल्या पंकजा मुंडे सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. कारण त्या गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षांमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यातच आता त्यांचे राजकीय विरोधक असलेले धनंजय मुंडे हे भाजपसोबत सरकारमध्ये सामिल झाल्यानं आता समिकरण बदलणार आहेत.

त्यामुळं पंकजा मुंडे आता काँग्रेसमध्ये एन्ट्री करणार असल्याचं जोरदार चर्चा आहे. या चर्चेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. (Pankaja Munde may enters in Congress discussions are sparked by statement of Nana Patole)

Pankaja Munde_Nana Patole
Samarjeet Ghatge: समरजीतसिंह घाटगेंनी जाहीर केली भूमिका! मुश्रीफांविरोधात ठोकला शड्डू

गुरुवारी पत्रकार परिषदेत पटोले यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, पंकजा मुंडे यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडची भेट घेतल्याची चर्चा आहे. सोनिया गांधींसह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची पंकजांनी भेट घेतल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं पंकजा या काँग्रेसमध्ये प्रवेश करु शकतात.

Pankaja Munde_Nana Patole
Pune Crime: कोयता घेऊन विद्यार्थ्यांना धमकावणाऱ्यांची पोलिसांनी कॉलेजमध्येच काढली धिंड; पुण्यातील प्रकार | Video Viral

यावर प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले, "जर त्यांची भेट झाली असेल आणि काँग्रेसमध्ये येण्यास त्या उत्सुक असतील तर त्यांचं स्वागत आहे" म्हणजेच पटोलेंनी देखील पंकजा मुंडे यांचं काँग्रेसमध्ये स्वागत असल्याचं म्हटलं आहे. एकूणच राज्यातील राजकारणाची एकूण स्थिती पाहता काँग्रेस पंकजा मुंडे जर काँग्रेसमध्ये सहभागी होणार असतील तर त्यांना चांगली संधी दिली जाईल, असंही बोललं जात आहे. (Latest Marathi News)

Pankaja Munde_Nana Patole
Supreme Court: शिक्षण संस्थामधील जातीवाद संपविण्यासाठी तुम्ही काय केले? सुप्रीम कोर्टानं UGC ला मागितली माहिती

दरम्यान, राष्ट्रवादीत फूट पाडून अजितदादा सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत परळीचे आमदार धनंजय मुंडे हे देखील आले असून त्यांना मंत्रिपदही देण्यात आलं आहे. त्यामुळं वारंवार भाजपनं डावलल्यानं आणि आता पुढील विधानसभेसाठी पंकजा मुंडेंना तिकीटही मिळणार नसल्याची चर्चा असल्यानं त्या येत्या काळात भाजप सोडतील असं बोललं जात आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.