‘पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिले नसेल. मात्र, जेव्हा वाटेल तेव्हा ते देतील,’ अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी मनातील खदखद बोलून दाखवली. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्रीपदासाठी वरिष्ठांची भेट घ्या असा सल्ला दिला आहे.(Pankaja Munde ministry Shinde cabinet mlc Eknath Khadse)
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मुंडे यांना स्थान मिळण्याची चर्चा होती. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे आधी राज्यसभा, विधान परिषदेसाठी डावललेल्या मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यामुळे मुंडे समर्थकांच्या नाराजीत भर पडली आहे.
माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर भाष्य केलं. ओबीसी नेत्यांना डावलण्यात आल्याचे अनेक प्रकार नेहमीच घडले आहे. त्यातही जे कोणी गोपीनाथ मुंडे यांच्या जवळचे होते, मग त्यात मी आहे, पंकजा मुंडे आहेत, हे सर्व जण बाजूला पडले आहेत. मात्र पुढील काळात या सर्वांना न्याय मिळेल, असाही आशावाद खडसे यांनी व्यक्त केला.
तसेच, पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळेल किंवा नाही याबाबत मला शंका वाटत आहे. मात्र त्यांनी मंत्रिपद मिळण्यासाठी जास्त वाट न पाहता आपल्या वरिष्ठांना भेटावे. असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
नाराज पंकजा मुंडे काय म्हणाल्या...
काल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंत्रिपद न मिळाल्यावरुन जाहीर खंत व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या होत्या, आज रक्षाबंधनचा दिवस आहे म्हणून राजकीय बोलणार नाही. सगळयांना माझ्या शुभेच्छा! राज्यात ओबीसी समाजाला त्यांचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळवावे, अशी या सरकारकडून अपेक्षा आहे. कदाचित माझी पात्रता नसेल म्हणून मंत्रिपद दिला नसेल आणि जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते देतील. माझं यावर काहीच म्हणणं नाही, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.