गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते पंकजा मुंडे यांना भाजप पक्षाकडून डावलण्यात येत असल्याचे पाहायाला मिळत आहे. अशातच काल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या होणाऱ्या जाहीर सभेमध्ये पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याचा आरोप झाला. नड्डा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या पत्रिकेत पंकजा मुंडे यांचं नाव नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. त्यानंतर पंकजा मुंडे यांना अखेर न्याय मिळाला आहे. मात्र, उपस्थितांच्या यादीत स्थान दिलेच नाही. (Pankaja Munde Name Bjp Programme Card Jp Nadda In Maharashtra politics)
चर्चेच्या उधाणानंतर भाजपने नड्डांच्या कार्यक्रमाच्या पोस्टरमध्ये बदल केल्याचे पाहायाला मिळाले. त्यांनी त्यांच्या पोस्टरमध्ये पंकजा मुंडे यांचा फोटो अॅड केला. मात्र, विशेष अतिथींच्या यादीत स्थान दिलेच नाही. जिल्हाध्यक्षांच नाव मात्र पंकजा मुंडे यांचे नाव नसल्याने पंकजा मुंडे यांच्यावरील पक्षाची नाराजी वाढल्याचे दिसून येत आहेत.
याशिवाय मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांची पक्षांतर्गत घुसमट लपून राहिलेली नाही. केंद्रीय मंत्रिमंडळातमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांना डावलल्यानंतर मुंबईत पंकजांनी राज्यातल्या नेत्यांवर अप्रत्यक्षपणे आसूड ओढला होता. तरीही भाजपमध्ये त्यांना मानाचं स्थान मिळालं नाही.
औरंगाबाद येथे होणाऱ्या कार्यक्रम पत्रिकेत पंकजा मुंडे यांचं नाव नसल्याचं समोर आलेलं आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. त्यामुळे भाजप पंकजा मुंडे यांना डावलण्याचं काम करत आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.