Pankaja Munde: 'राहुल गांधींना पाहिलंही नाही, ही बातमी कोणी पसरवली', पंकजा मुडेंचा उद्विग्न सवाल

सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट झाली का? पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितलं
Pankaja Munde
Pankaja MundeEsakal
Updated on

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासोबत भेट झाल्याच्या बातम्या काही वृत्तपत्रांनी दिल्या होत्या. त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यानंतर काल राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली तर त्या भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाणार का यांच्या चर्चा सुरू झाल्या. (Latest Marathi News)

या संपूर्ण चर्चेवर स्पष्टीकरण देण्यासाठी पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासोबतच्या भेटीच्या बातम्याचं खंडण केलं आहे. तर त्यावर बोलताना पंकजा म्हणाल्या कि, मी काँग्रेस नेत्यांची भेट घेतली नाही, माझं करिअर संपवण्याचा हा डाव नेमका कुणाचा आहे? असा प्रश्न देखील त्यांनी केला आहे.(Latest Marathi News)

Pankaja Munde
Cabinet Expansions: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली! शिंदे गटाला मिळणार न्याय?

'तुम्ही प्रश्न चिन्ह लावून बातम्या देता? पण त्यामागची सत्यता तपासली पाहिजे. मी गेली 20 वर्ष राजकारणात काम करत आहे. चर्चा मुद्दाम घडवून आणल्या जात आहेत. पंकजा मुंडे पात्र की अपात्र? हे पक्ष ठरवेल मी कसं सांगू. पाठीत खंजीर खुपसण्याच रक्त माझं नाही. ज्या चॅनलने काँग्रेस नेत्यांची भेट घेतली ही बातमी दिली. त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार. त्यांच्याकडे पुरावे मागणार?' असं पंकजा मुंडे म्हणाल्या.(Latest Marathi News)

Pankaja Munde
Sharad Pawar VS Ajit Pawar: शरद पवारांचे टेन्शन वाढलं...तीन शिलेदारांनी सोडली साथ ? आमदारांनी घेतली अजितदादांची भेट

तर मागील दोन-तीन दिवसांपासून पंकजा मुंडे या काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा वारंवार समोर येत होत्या. त्यांनी सांगलीतील एका मोठ्या नेत्याच्या माध्यमातून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली, अशा काही बातम्या देखील समोर आल्या होत्या. त्यावर आता अखेर पंकजा मुंडे यांनी मौन सोडलं आहे. पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडली आहे.(Latest Marathi News)

तर मला पक्षाने अनेकदा डावललं तरी मी नाराजी व्यक्त केली नाही. अप्रामाणिकपणा माझ्या रक्तात नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

Pankaja Munde
Marathi News Update: राष्ट्रवादीच्या दोन गटातील वाद पेटला, प्रत्येक अपडेट इथं वाचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.