Pankaja Munde: बीडमधील पराभवानंतर भाजपचा बी प्लॅन, पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवणार?

Pankaja Munde: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. मुंडेंचा पराभव बीडकरांच्या जिव्हारी लागला आहे.
Pankaja Munde
Pankaja MundeEsakal
Updated on

ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून पुढे आलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील सामाजिक ताणेबाणे सावरण्यासाठी भाजपने विधानसभा निवडणुकीच्या आधी पावले टाकणे सुरु केले आहे. ओबीसी समाजाने पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघातील पराभव जिव्हारी लावला आहे.

Devendra Fadnavis Pankaja Munde Maharashtra Politics

Pankaja Munde
ब्रेकिंग! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाच्या संपर्क कार्यालयात शिरली कार; घटना सीसीटीव्हीत कैद, संशयित पोलिसांच्या ताब्यात

आजवरचे योगदान लक्षात घेता त्यांना आणि त्यांच्या समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्यसभेवरील नियुक्तीचे पाऊल उचलले जाणे गरजचे असल्याचे फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाला सांगितल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. येत्या काही दिवसांत विधान परिषदेच्या उमेदवारांबरोबरच महाराष्ट्रातून रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांवर उमेदवार कोणते द्यायचे, हा निर्णय घ्यावा लागणार आहे.

या पूर्वी दोनदा पंकजा यांना विधानपरिषदेवर नेमण्याचा प्रस्ताव प्रदेश भाजपने पाठवला होता. पंकजा यांचे पुनर्वसन केवळ त्यांच्यासाठी नव्हे तर भाजपच्या ओबीसी मतपेढीसाठी आवश्यक होते. मात्र त्या जननेत्या असल्याने त्यांना पक्षश्रेष्ठींनी लोकसभेची उमेदवारी दिली होती.

Pankaja Munde
Amit Thackeray : ''आमच्या बिनशर्त पाठिंब्यावर त्यांनी मुलाला आमदार केलं..'' वरळीतून अमित ठाकरे लढणार? म्हणाले...

पंकजांच्या उमेदवारीतून ‘बेरीज’

महाराष्ट्रात विधानसभेला सामोरे जाताना काही सामाजिक बांधणी करावी लागेल, असे भाजपच्या नेत्यांनी ठरवले आहे. या बांधणी अंतर्गतच महाराष्ट्राच्या प्रश्नांना केंद्रामध्ये उत्तमरीत्या वाचा फोडणाऱ्या काही तरुण नेत्यांची तिथे गरज असेल, हे स्पष्ट आहे. ही गरज लक्षात घेता महिलांचे नेतृत्व आणि ओबीसी समाजाच्या नेत्या म्हणून पुढे आलेल्या पंकजा मुंडे यांना तेथे संधी देणे हे बेरजेच्या राजकारणातले महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे महाराष्ट्र भाजपने कळवले आहे.

Pankaja Munde
Maratha Reservation : ''चंद्रकांत पाटील सांगतात तो फॉर्म्युला आम्हाला अमान्य, सरकार असं फसवणार असेल तर...'' जरांगे पाटलांची सावध भूमिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.