मुंबई : मी पक्षाअंतर्गत बैठकीसाठी चालले आहे. मी दिल्लीला दर १५ दिवसांनी जात असते. माझी भूमिका अशी आहे की, आम्ही ज्या भूमिकेमध्ये आपण आहोत त्याचे सक्षमपणे करायला हवे. आणि आम्ही ते काम करीत आहोत. आपण आता जनतेसाठी काम करावे. सरकार पडतंय की राहत हा गौण विषय आहे, असे मत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केले. दिल्लीला बैठकीसाठी जाण्यापूर्वी त्या आज रविवारी (ता.१७) प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
मुंडे म्हणाल्या, की मराठवाडा दौऱ्याला मी नव्हते कारण मी त्यावेळी आजारी होते. देवेंद्र फडणवीस यांना देखील ते माहीत आहे. राज्यात मी ज्या व्यासपीठावर आवश्यकता आहे तिथे मी असते. शरद पवारांचे (Sharad Pawar) वक्तव्य मी ऐकले नाही, असे त्यांनी सांगितले. मी मोठी नेता नाही. मोठ्या नेत्यांकडून लहान नेत्यांनी शिकायचे असते. पवार साहेब आम्हाला शिकवतील, असे त्या म्हणाल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.