Pankaja Munde: हकीकत को तलाश..., जरुरत से जादा इमानदार...; शायरींमधून व्यक्त झाली खदखद

पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान गडावर पार पडला
pankaja munde
pankaja mundesakal
Updated on

बीड : पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा बीडमधील भगवान गडावर पार पडला. यावेळी त्यांनी शेरोशायरीतून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या या शेरोशायऱ्यांची सर्वत्र चर्चा होती. यातून त्यांनी आपल्या मनातील खदखदही बोलून दाखवली. (Pankaja Munde Shayari expressed his sadness at Bhagwan gad melava)

pankaja munde
पंकजा मुंडेंनी पुढच्यावेळी शासकीय हेलिकॉप्टरनं मेळाव्याला यावं; जानकरांनी व्यक्त केली अपेक्षा

मी चिखलफेक करणारी नाही, तर चिखल तुडवणारी आहे. संघर्ष करणं हे आमच्या रक्तातचं आहे. माझ्या जीवनात जे गोपिनाथ मुंडेंचे विरोधक होते त्यांच्याविषयी देखील मी वाईट बोलले नाही. कोणावर वैयक्तिक आरोप केले नाहीत. पण चर्चा पसरत असतात "हकीकत को तलाश करना पडता है, अफवाए तो घर बैठे मिल जाती है" अशा शब्दांत त्यांनी त्यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चेवर भाष्य केलं.

pankaja munde
Pankaja Munde: मी कधीही कुणासमोर झुकणार नाही; पंकजा मुंडेंचा एल्गार

मी काम केलं नाही का? चांगली मंत्री म्हणून मी तुमच्यापर्यंत विकास पोहोचवला नाही का? राज्यासह राज्याबाहेर पक्षाचं काम पोहोचवलं नाही का? असे अनेक सवाल विचारत पंकजा मुंडे म्हणाल्या, "माना की औरों के मुकाबले कुछ पाया नही हमने, पर खुद को गिरोके कुछ उठाया नहीं हमने" तुमचं जर माझ्यावर प्रेम असेल तर मला शोभेल असं वागा. माझी तुम्हाला विनंती आहे की, मी २०२४ ला मला पक्षानं परळीतून तिकीट दिलं तर त्याच्या तयारीला मी लागणार आहे.

pankaja munde
Dasara Melava: डब्ब्यातून गोळा केलेली वर्गणी ते पैलवानांची सुरक्षा, पहिल्या दसऱ्या मेळाव्याचा इतिहास

माझं असंच आहे, "जरुरत से जादा इमानदार हूं मै इसलिए सबके नजरों मे गुनहगार हूं मै" त्यामुळं मला पक्षाला त्रास द्यायचा नाही. कुठल्या नेत्याबद्दल मला काही बोलायचं नाही. आपण आपलं शांत रहायचं. भगवान बाबांची प्रतिमा समोर आणायची. मी दुर्गेची रुप धारणं करावं असं तुम्हाला वाटतं ते मी करतेच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.