Teacher Constituency Election : परब, अभ्यंकर आणि डावखरे विजयी;नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे किशोर दराडे आघाडीवर

राज्य विधान परिषदेच्या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही सत्ताधारी महायुती व विरोधी महाविकास आघाडीत तुल्यबळ लढत झाली आहे. जाहीर झालेल्या तीन मतदारसंघापैकी दोन जागा महाविकास आघाडीने तर एक जागा महायुतीने जिंकली आहे.
Teacher Constituency Election
Teacher Constituency Electionsakal
Updated on

मुंबई : राज्य विधान परिषदेच्या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही सत्ताधारी महायुती व विरोधी महाविकास आघाडीत तुल्यबळ लढत झाली आहे. जाहीर झालेल्या तीन मतदारसंघापैकी दोन जागा महाविकास आघाडीने तर एक जागा महायुतीने जिंकली आहे. तर नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर आहेत.

मुंबईतील पदवीधर मतदारसंघापाठोपाठ शिक्षक मतदार संघाची जागा देखील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने जिंकत मुंबईवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते ॲड. अनिल परब यांचा मुंबई पदवीधर मतदारसंघातून ४४ हजार ७८४ मतांनी, शिवसेना ठाकरे गटाचे मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार ज. मो. अभ्यंकर यांचा तर कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा विजय झाला आहे.

मुंबई, नाशिक आणि कोकण मतदार संघाच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांसाठी २६ जून रोजी मतदान झाले होते. या चारपैकी शिवसेना ठाकरे गटाकडे मुंबई पदवीधर मतदारसंघाची एक, भाजपकडे कोकण पदवीधर मतदारसंघ, शिवसेना शिंदे गटाकडे नाशिक शिक्षक मतदारसंघ आणि मुंबई शिक्षक मतदार संघाची जागा समाजवादी गणराज्य पक्षाकडे होती. मुंबई पदवीधर मतदारसंघाची जागा गेली ३० वर्षे शिवसेना जिंकत आलेली आहे. तो शिरस्ता या निवडणुकीतही कायम राहिला. भाजपने ही लढत थेट होईल याची काळजी घेत शिवसेना शिंदे गटाकडून डॉ. दीपक सावंत यांनी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला होता. भाजपचे उमेदवार किरण शेलार यांच्यासाठी भाजपने सर्व यंत्रणा राबवत पहिल्यांदाच या जागेसाठी जय्यत तयारी केली होती. मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये झालेल्या थेट लढतीत शिवसेनेचे नेते ॲड. परब हे ४४ हजार ७८४ मते मिळवून विजयी झाले. भाजपच्या शेलार यांना केवळ १८ हजार ७७२ मते मिळाली. जिंकून येण्यासाठी ३२ हजार ११२ मतांचा कोटा आवश्यक होता. मात्र भाजप उमेदवाराला निम्मी मते देखील मिळाली नाहीत.

मुंबई शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढतीत शिवसेना ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर हे विजयी झाले. महायुतीतील तिन्ही पक्षांनी परस्पर उमेदवार उभे केल्याचा फायदा अभ्यंकर यांना झाला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, भाजपचे शिवनाथ दराडे आणि शिवसेना शिंदे गट पुरस्कृत शिवाजी शेंडगे आणि  समाजवादी गणराज्य पक्षाचे सुभाष मोरे असे तगडे उमेदवार रिंगणात असल्याने अभ्यंकर यांचा निसटत्या मतांनी विजय झाला.

शिवसेनेचे दराडे आघाडीवर

विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या तिरंगी लढतीच्या निवडणुकीत दुसऱ्या फेरीअखेर शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर दराडे हे ८,४०८ मतांनी आघाडीवर आहेत. अपक्ष विवेक कोल्हे व शिवसेना (उध्दव ठाकरे) पक्षाचे ॲड. संदीप गुळवे हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये दुसऱ्या फेरीअखेर किशोर दराडे यांना २४,३९३, विवेक कोल्हे १५,९८५ तर संदीप गुळवे यांना १४,९९२ मते मिळाली.

भाजपने कोकणचा गड राखला

कोकण पदवीधर मतदारसंघ भाजपने पुन्हा राखला. तिथे भाजपचे निरंजन डावखरे यांनी कॉँग्रेसच्या रमेश कीर यांचा पराभव करत तिसऱ्यांदा या मतदारसंघात विजय मिळवत आपला गड राखला. नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे हे आघाडीवर होते. इथे त्यांची लढत शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार यांच्यात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com