मुंबई: अँटिलिया प्रकरणात (Antilia Case) दररोज वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. मुंबईतील अति महत्वाच्या गुन्ह्यांसंदर्भात सचिन वाजे दररोज नियमित माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटत असल्याचा गंभीर आरोप परमबीर सिंग (Parambir Singh)यांनी केला आहे. यावर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रतिक्रिया दिली असून,परमबिर सिंह हे राजकिय दबावा पोटी असा आरोप करत आहेत. असं त्यांनी म्हटलंय.
परमबीर सिंग यांची पोलखोल होणार त्या आधी एनआयएने तपास काढून घेतला.
मलिक म्हणाले, परमबिर सिंह हे राजकिय दबावा पोटी असा आरोप करत आहेत. मनसुख हिरेन आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणाचा तपास एटीएस चांगला करत होते. तपासात परमबीर सिंग यांची पोलखोल होणार त्या आधी एनआयएने तपास काढून घेतला. एनआयएने चार्जशिटमध्ये परमबिर सिंह यांनी कशा प्रकारे इलेक्ट्राॅनिक एविडन्स नष्ठ करण्याचा प्रयत्न केला त्याचा उल्लेख आहे. मात्र सीबीआय आणि एनआयए याचा वापर करून केंद्र हे राज्यसरकारला बदनाम करत असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
एनआयए ने हा तपास आपल्या हाती घेतल्यानंतर परमविर सिंग यांच्या घरी बैठक झाली. एनआयईच्या माध्यमातून परमविर सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. परमबीर सिंग यांच्या माध्यमातून खोटे आरोप करण्यात आले आहेत. परमबीर सिंग यांच्या माध्यमातून केंद्र सरकार महाविकास आघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. मनसूख हिरेन आणि अंजली या प्रकरणात परमविर सिंग यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला जातोय मात्र न्यायालयात सत्य समोर येईल असेही ते म्हणाले.
ओवेसी यांच्यावर झालेल्या हल्ला संदर्भात मलिक म्हणाले, ओवैसी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात निवडणुका शांततेत झाल्या पाहिजेत याची जबाबदारी उत्तरप्रदेश पोलिसांवर स्टार प्रचारक यांच्या सुरक्षेबाबत निवडणूक आयोगाने पोलिसांना आदेश दिले पाहिजे.ओवेसी यांच्यावर हल्ला गंभीर असून याची दखल उत्तरप्रदेश पोलिसांनी निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. असे ही ते म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.