तब्बल 8 महिन्यानंतर परमबीर सिंह-सचिन वाझे एकमेकांसमोर! काय घडलं?

sachin waze
sachin wazeesakal
Updated on

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (parambir singh) अखेर चांदीवाल आयोगासमोर (chandiwal commission) हजर झाले. या दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे (Sachin Vaze) तब्बल ८ महिन्यांनतर एकमेकांसमोर आले. त्यावेळी दोघांमध्ये काही सेकंदांसाठी संवाद झाला. काय घडलं नेमकं?

काही सेकंदांच्या भेटीत दोघांमध्ये काय बोलणं झालं?

काही दिवसांपूर्वी उद्योजक मुकेश अंबानींच्या (mukesh ambani) मुंबईतील घराबाहेर स्फोटकं आढळली होती. याचप्रकरणी सचिन वाझेंना अटक करण्यात आली. सचिन वाझेंच्या अटकेनंतर तब्बल ८ महिन्यानंतर परमबीर सिंह आणि सचिन वाझे एकमेकांसमोर आले. त्यामुळे काही सेकंदांच्या भेटीत या दोघांमध्ये काय बोलणं झालं? याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.

sachin waze
विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास आम्ही तयार - PM मोदी

परमबीर सिंहांचं जामीनपात्र वॉरंट रद्द

दरम्यान चांदीवाल आयोगानं परमबीर सिंहांना बजावलेलं जामीनपात्र वॉरंट रद्द केलं आहे. आयोगासमोर हजर राहण्यापूर्वी परमबीर सिंह आणि सचिन वाझे एकमेकांसमोर आले होते. त्यावेळी या दोघांमध्ये काही सेकंदांसाठी संवादही झाला. पण त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं ते कळू शकलं नाही. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं होतं. अशातच परमबीर सिंह यांच्या चौकशीसाठी चांदीवाल आयोगाची स्थापना झाली होती. त्यानंतर बराच काळ परमबीर सिंह बेपत्ता होते. कोर्टानं त्यांना फरारही घोषित केलं होतं. अशातच चांदीवाल आयोगानं चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावलं होतं. परंतु, परमबीर सिंह चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. त्यावेळी चांदीवाल आयोगानं त्यांना दोन वेळा जामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. ते आज आयोगानं रद्द केलं आहे.

sachin waze
Omicron | केंद्राची नवी नियमावली, प्रवाशांवर घातली बंधने

सीआयडी चौकशीसाठी बोलावणार

मुंबईत दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणाऱ्या परमबीर सिंह (Parambir Singh)यांना आता सीआयडी (CID) चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती आहे. येत्या सोमवारी आणि मंगळवारी सीआयडी परमबीर सिंह यांची चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()