पालकांनो, चिमुकल्यांना नका देऊ मोबाईल! मोबाईल अतिवापराने दृष्टिदोष, मान, पाठ अन्‌ डोकेदुखीचा वाढेल त्रास; तर्कशक्ती व स्मरणशक्ती होतेय कमी, ‘हे’ करा उपाय

मोबाइलचे जसे चांगले फायदे तसेच तोटे देखील आहेत. दीड-दोन वर्षाच्या चिमुकल्याच्या हाती देखील मोबाईल दिसू लागला आहे. घरातील कामे करताना मुलगा चिडचिड करू नये म्हणून आईच त्याच्या हाती मोबाईल देवू लागली. पालक देखील मुलगा रडायला की त्याच्या हाती मोबाईल देत आहेत.
solapur
Parenting TipsSakal
Updated on

सोलापूर : मोबाइलचे जसे चांगले फायदे आहेत, तसेच तोटे देखील आता समोर येवू लागले आहेत. दीड-दोन वर्षाच्या चिमुकल्याच्या हाती देखील आता मोबाईल दिसू लागला आहे. घरातील कामे करत असताना मुलगा चिडचिड करू नये म्हणून आईच त्याच्या हाती मोबाईल देवू लागली. पालक देखील मुलगा रडायला की त्याच्या हाती मोबाईल देत आहेत. मुलगा जेवत नाही, घरात पसारा करतो म्हणूनही अनेकजण चिमुकल्याला मोबाईल देतात. मात्र, मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांच्या अवयवयांसह त्यांच्या शारीरिक व मानसिकतेवरही दूरगामी परिणाम होतात ही वस्तुस्थिती आहे.

१) उद्‌भवतो मान, पाठदुखीचा त्रास

लहान मुलांना गप्प किंवा शांत बसविण्यासाठी त्यांच्या हाती मोबाईल दिला जातो. पण, ते एकाच ठिकाणी बसून मोबाईलवर काहीही पाहतात. त्यावेळी मान अवघडते. याशिवाय हातात मोबाईल असल्याने व कोणत्याही स्थितीत तासन्‌तास बसून राहिल्याने पाठदुखीचाही त्रास त्यांना पुढे काही दिवसांनी उद्‌भवू शकतो.

---------------------------------------------------------

२) दृष्टीदोषातून लागेल बालवयातच चष्मा

नैसर्गिकरित्या दिलेले डोळे जपणे जरुरी असते. पण, आता सर्रासपणे लहान मुलांच्या हाती मोबाईल दिसतो. स्क्रीन टाइम जेवढा जास्त, तेवढा त्यांच्या डोळ्यावर परिणाम होऊन पुढे दृष्टिदोष उद्‌भवतो. अंधूक दिसणे, डोके दुखण्याचा त्रास सुरू होते. त्यावेळी त्या लहान मुलाला चष्मा लावावा लागतो. डोळ्यावर ताण पडल्याने डोकेदुखीचा त्रास पुढे आयुष्यभर पिछा सोडत नाही.

----------------------------------------------------------

३) हाताचे स्नायू आखडतात

लहान मुलांना शाळेत लिखाण करायचे असते, परीक्षेत लिखाणाशिवाय जास्त गुण अशक्यच. पण, लहानपणापासून हाती सतत मोबाईल राहिल्याने हाताचे स्नायू आखडून लिखाणाची गती मंदावू शकते. त्यांची मोबाईल घेऊन बसण्याची स्थिती व्यवस्थित नसल्याने पाठीचा कणा ताठ राहात नाही. त्यानंतर त्याला पाठदुखीचा त्रास लहानपणापासूनच सुरू होतो.

-----------------------------------------------------------

४) हिंसात्मक वृत्तीला मिळते चालना

सध्या मोबाईलवर वेगवेगळ्या प्रकारच्या शेकडो ऑनलाइन गेम्स्‌ उपलब्ध आहेत. लहान मुलांचा सर्वाधिक कल फायटर गेम्सकडे असतो. अशा गेम्स खेळताना तो मुलगा गंभीर झालेला असतो. शेजारील दुसरा मुलगा देखील त्यावेळी ‘याला मार, त्याला मार’ असे म्हणत असतो. त्यावेळी हिंसात्मक विचाराला खतपाणी मिळत. त्यानंतर चिडचिडपणा वाढतो, पुढे जाऊन अशी मुले एकलकोंडी बनतात.

--------------------------------------------------------------

५) मेंदूवर परिणाम होतो

मुलांची कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, क्रियाशीलता व बुद्धिमत्ता लहान वयातच वाढत असते. त्याच वयात त्यांच्या हाती मोबाईल दिल्याने ते बिनकामाचे व्हिडिओ पाहतात. सतत काहीतरी गेम्स्‌ खेळण्यामुळे त्यांना चांगल्या गोष्टी सुचत नाहीत आणि त्यामुळे क्रियाशीलता कमी होते. मोबाइलमुळे सांघिक मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होते, व्यायाम नसल्याने लठ्ठपणा वाढतो. अभ्यासातील लक्ष कमी होते आणि तो मुलगा मोबाइलच्या आहारी गेल्याने मेंदूवरही दुष्परिणाम होवू शकतात.

पालकांनी करावेत हे उपाय...

  • मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांच्यात खेळ किंवा कलेची (चित्रकला वगैरे) आवड निर्माण करावी

  • मुलांचा हट्ट पुरवणे किंवा त्यांना गप्प, शांत बसविण्यासाठी हाती मोबाईल देवू नये

  • पालकांनी स्वत: घरी असताना मोबाइलचा वापर कमी करावा, जेणेकरून मुलालाही सवय लागणार नाही

  • तर्कशक्ती, स्मरणशक्ती वाढेल, असे खेळ पालकांनी स्वत: मुलांसोबत खेळणे आवश्यक

पालकांनी मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यायलाच हवी

मुल जन्मल्यानंतर प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या वेगवेगळ्या अवयवयांचा, शरीराचा व मानसिकतेचा विकास होत असतो. त्यावर त्यांच्या पुढील क्रिया अवंलबून असतात. पण, मोबाईल सतत त्यांच्या हाती दिल्याने ते टप्पे मागे राहतात आणि बालपणापासून त्याला विविध आजार किंवा व्याधी जडू शकतात. अशावेळी पालकांनी संभाव्य धोके किंवा परिणामांचा गांभीर्याने विचार करून लहान मुलांना मोबाईल देणे टाळावे.

- डॉ. विना जावळे, प्राचार्य, शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.