फळ्यावरील अक्षरं विद्यार्थ्यांना पुसट; पालकांपुढे मुलांच्या दृष्टिदोषाचे आव्हान

ही बाब उघड झाली आहे ती १५ जूननंतर सुरू झालेल्या शाळा सुरू झाल्यानंतर.
students
studentsesakal
Updated on

नाशिक : गेल्या दोन वर्षांच्या लॉकडाउनदरम्यान (lockdown) ऑनलाइन शिक्षणपद्धती (Online education), मुलांकडून मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टीव्हीचा अभ्यासाव्यतिरिक्तही अतिवापर मुलांच्या दृष्टिदोषासाठी (Visual impairment) कारणीभूत ठरत आहे. ही बाब उघड झाली आहे ती १५ जूननंतर सुरू झालेल्या शाळा सुरू झाल्यानंतर. त्यात अजूनही काही विद्यार्थ्यांच्या निकट दृष्टिदोषाकडे पालकांकडून दुर्लक्ष होत असल्याचे विविध शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांकडून जाणून घेतलेल्या माहितीत दिसून आले आहे.

दोन वर्षांनंतर सुरू झालेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविल्यानंतर शिक्षकांनी प्रश्‍न विचारले असता विद्यार्थी गप्प राहत आहेत. ही बाब शिक्षकांना काहीतरी चुकल्यासारखे वाटू लागल्याने त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांना फळा किंवा स्क्रीनवरील अक्षर पुसट दिसत असल्याने त्याची नोंद घेतली गेली नसल्याचे कारण पुढे आले. ही बाब शहरासाठी नव्हे तर देशासाठी घातक असल्याने शिक्षक पालकांशी संवाद साधत विद्यार्थ्यांच्या नेत्रांची तपासणी करण्याचा सल्ला देत आहेत. विद्यार्थ्यांना दूरचे अस्पष्ट दिसणे, डोळे दुखणे, डोळ्यांवर ताण येणे अशी लक्षणे दिसत असल्याचे शिक्षकांसह नेत्रतज्ज्ञांनी सांगितले.


students
पारंपारिक शाखांतील नव्या अभ्यासक्रमांकडे कल

दृष्टिदोषाची लक्षणे
मुले घरात जवळून टीव्ही बघत असतील, मोबाईल अतिजवळ धरून बघत असतील किंवा तिरळेपणा असेल, शाळेत फळ्यावरील अक्षर दिसत नसेल, वाचन करताना अक्षरांवरून बोट फिरवत असेल किंवा दूर बघताना डोळे बारीक करून बघत असेल तर वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांकडून आपल्या पाल्याची दृष्टी तपासून घ्या. आई किंवा वडिलांना चष्म्याचा नंबर असल्यास मुलांमध्येदेखील दृष्टिदोष असू शकतो किंवा मोठ्या मुलाला चष्मा असल्यास घरातील लहान भावंडांची दृष्टीदेखील तपासून घ्या.

आळशी डोळा
वयाच्या सहा ते सात वर्षांआधी दृष्टिदोषाचे निदान होऊन योग्य तो चष्म्याचा नंबर वापरल्यास दृष्टी अधू होण्यापासून वाचू शकते. दृष्टिदोषाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, काही मुलांना आपल्याला एका डोळ्याने दिसत नाही किंवा कमी दिसते हे माहीतच नसते. अशा मुलांमध्ये दृष्टिदोष असलेला डोळा आळशी होऊन पुढे तिरळा होतो आणि अशा मुलांमधील त्या डोळ्यातील दृष्टिदोष कायमस्वरूपी राहू शकतो. पुढे जाऊन या मुलांना पोलिस, भारतीय सैन्यदल, भारतीय रेल्वे अशा अचूक दृष्टी आवश्यक असलेल्या ठिकाणच्या नोकरीपासून वंचित राहावे लागते. नेत्ररोगतज्ज्ञांनी दिलेला चष्मा किंवा आळशी डोळ्यांसाठी सुरू केलेली उपचारपद्धती समजून घ्या. नेत्ररोगतज्ज्ञांनी दिलेल्या तारखेनुसार वेळोवेळी तपासणीसाठी जा. मुलांमध्ये दूरदृष्टिदोष असल्यास चष्म्याचा नंबर वयाच्या १८ वर्षांपर्यंत वाढू शकतो. त्यामुळे नियमित तपासणी अनिवार्य आहे.

students
अकरावी प्रवेशात घोटाळा?


मुलांना मोबाईल देणे टाळा

बाळ रडतेय, घरकाम करू देत नाही म्हणून लहान बाळाच्या हाती मोबाईल देऊ नका. ही सवय पुढे दृष्टीसाठी घातक ठरू शकते. दृष्टिदोषामुळे येणारे अंधत्व पूर्णपणे वेळीच निदान आणि उपचार केल्यास आपण टाळू शकतो. मोतीबिंदू हे भारतात अंधत्वाचे प्रमुख कारण आहे. त्यानंतर दुर्लक्षित दृष्टिदोष हे कारण वर डोके काढत आहे. यासाठी पालकांनी घरी, शिक्षकांनी शाळेत वर सांगितलेल्या मुलाच्या दृष्टिदोषाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

''मोतीबिंदूनंतर दृष्टिदोष हे अंधत्वाचे दुसरे कारण आहे. कमी खर्चात (योग्य वेळी चष्म्याचा वापर करून) टाळू शकतो. असे असूनही आपले त्याकडे लक्ष नाही. निदान होण्यास उशीर झाला तर बालकाला कायमचा दृष्टिदोष राहू शकतो.'' - डॉ. धर्मेंद्र पाटील, जळगाव

''कोरोनामुळे सर्वसामान्यांच्या जीवनशैलीत अनेक बदल झाले. या बदललेल्या जीवनशैलीमुळे डोळ्यांवर अनेक प्रकारचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. यामध्ये विशेषत: मुलांमध्ये निकट दृष्टिदोष (Myopia)चे प्रमाण साधारणत: तीनपटीने वाढलेले आहे. याचे मुख्य कारण मोबाईल आणि कॉम्प्युटरचा जास्त वापर हे आहे.'' - डॉ. अस्मिता खुने, भगवती आय हॉस्पिटल, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.