पुणे - राज्यातील तिसरी आघाडी ‘परिवर्तन महाशक्ती’ची गुरुवारी (ता. १७) पुण्यात बैठक झाली. त्यात विविध मतदारसंघांत १५० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यावर एकमत झाले आहे. त्याचबरोबर समाजातील सर्वसामान्य नागरिक आमच्याबरोबर असून आमचा लढा प्रस्थापितांच्या विरुद्ध आहे, असे ‘परिवर्तन महाशक्ती’च्या नेत्यांनी सांगितले.