Latest Marathi News Update : एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Latest Marathi News | राजधानी दिल्लीतील पाणी प्रश्नावर आतिशी यांनी २१ जून पासून उपोषण सुरु केलं आहे.
live blog
live blogsakal

NEET Paper Leak Live: नीट परीक्षेतील घोटाळ्यातील आणखी एका आरोपीला लातूरमध्ये अटक

NEET 2024 परीक्षेतील घोटाळ्यातील आणखी एका आरोपीला लातूर पोलिसांनी अटक केली आहे. संजय जाधव असे आरोपीचे नाव आहे. चारपैकी दोन आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी लातूर येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक जलील खान पठाण याला २३ जून रोजी अटक करण्यात आली होती.

Baichung Bhutia Live: माजी भारतीय फुटबॉलपटू बायचुंग भुतिया यांचा राजकारणाला रामराम

माजी भारतीय फुटबॉलपटू आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे उपाध्यक्ष बायचुंग भुतिया यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या सिक्कीम विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

Porsche Accident Live: पोर्शे अपघातातील अल्पवयीन आरोपीची सुटका

पोर्शे अपघातातील अल्पवयीन आरोपीची मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर बाल सुधारगृहातून 35 दिवसांनी सुटका करण्यात आली आहे.

Vasai Live: वसईमध्ये स्कूल बस थेट घुसली मेडिकलमध्ये

वसईमध्ये एका स्कूल बस थेट मेडिकलमध्ये घुसली चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

Pune Accident Live: पोर्शे अपघातातील पीडितांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोर्शे कार अपघातातील पीडितांच्या कुटुंबीयांना 10 लाखांचा धनादेश दिला.

BJP Whip Live: भाजपने आपल्या सर्व लोकसभा सदस्यांना जारी केला व्हिप

भाजपने आपल्या सर्व लोकसभा सदस्यांना उद्या, २६ जून रोजी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे.

 Pune Porsche Accident Live : पोर्शे अपघात पीडितांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी १० लाखांची मदत

पोर्शे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुण आणि तरुणीच्या कुटुंबियांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून त्यांना १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली होती.

Wari 2024 Live : निवृत्तीनाथ महाराजांची पालखी सिन्नरमध्ये दाखल

निवृत्तीनाथ महाराजांची पालखी सिन्नरमध्ये दाखल झाली असून पालखीचे पहिले गोल रिंगण सिन्नर तालुक्यातील दातली येथे उत्साहात पार पडले.

Nita Ambani Live : नीता अंबानी यांची चाटच्या दुकानाला भेट 

वाराणसी, उत्तर प्रदेश: रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी चाटच्या दुकानाला भेट दिली आणि स्थानिकांशी संवाद साधला

Parliament Session 2024 Live : जय भीम, जय मीम म्हणत असदुद्दीन ओवैसींनी संसद सदस्य म्हणून घेतली शपथ

AIMIM चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी 18 व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. ‘जय भीम, जय मीम, जय तेलंगणा, जय पॅलेस्टाईन’ अशा शब्दांत असदुद्दीन ओवेसी यांनी शपथविधीची सांगता केली.

Yogi Government Live : पेपर फुटीप्रकरणी योगी सरकारनं आणला अध्यादेश; दोन वर्षापासून जन्मठेपेपर्यंतची शिक्षा, एक कोटीपर्यंत दंडाचीही तरतूद

लखनौ : योगी सरकारने आज, मंगळवारी उत्तर प्रदेशातील पेपरफुटीबाबत कडक कायदा करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानुसार या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. या अध्यादेशात दोषींना दोन वर्षापासून जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे, याशिवाय एक कोटी रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याचीही तरतूद आहे.

Nagpur Poshan Aahar Live : पोषण आहारात आढळली मृत चिमणी, नागपुरात धक्कादायक प्रकार उघड

नागपूरमध्ये पोषण आहारामध्ये मृत चिमणी आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये मृत चिमणी आढळल्यामुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोषण आहारात मृत चिमणी आढळल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

Pune Porsche Accident Live : पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला जमीन मंजूर; मुंबई हायकोर्टाचे मुलाला सोडण्याचे आदेश

पुण्यामधील पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला मुंबई हायकोर्टाने जमीन मंजूर केला आहे. त्यामुळे बाल सुधारगृहातून या मुलाची सुटका होणार आहे. इथे क्लिक करा

Excise Policy Case Live : दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांचा मुक्काम तुरूंगातच राहणार; दिल्ली HC ची जामिनावर स्थगिती कायम

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर काल (दि.24) सर्वोच्च न्यायालयाने दिलासा न देता दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णय येईपर्यंत वाट बघण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आज (दि. 25) दिल्ली उच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिला असून, केजरीवाल यांना ट्रायल कोर्टाने दिलेल्या जामीनावर स्थगिती कायम ठेवली आहे. या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या मुख्य खंडपीठात सविस्तर सुनावणीची गरज असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे तूर्तास कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या जामीनाच्या आदेशावरील स्थगिती कायम राहणार असल्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालायने दिले आहेत.

Parliament Session 2024 Live : ..तर आम्ही एनडीए उमेदवाराला पाठिंबा देऊ; असं का म्हणाले काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल?

काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल म्हणाले, "आम्ही अजून वाट पाहत आहोत, जर ते उपसभापतीपद देण्यास तयार असतील तर, आम्ही एकमताने लोकसभा अध्यक्षांना पाठिंबा देण्यास तयार आहोत."

Delhi News Live : आप नेते सत्येंद्र जैन यांना धक्का, सर्वोच्च न्यायालयाचा याचिकेवर विचार करण्यास नकार

आम आदमी पक्षाला पुन्हा एकदा झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाचे (आप) नेते सत्येंद्र जैन यांच्या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात सत्येंद्र जैन यांच्या डिफॉल्ट जामिनाशी संबंधित याचिका जुलैपर्यंत पुढे ढकलण्याच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयाने आव्हान दिले आहे.

Parliament Session 2024 Live : एनडीएचा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल - रामदास आठवले

के. सुरेश यांना लोकसभा अध्यक्षपदासाठी रिंगणात उतरवल्याबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, "लोकशाहीत त्यांना (इंडिया आघाडीला) त्यांचा उमेदवार उभा करण्याचा अधिकार आहे, परंतु आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे, आमच्याकडे बहुमतापेक्षा जास्त आहेत. एनडीए उमेदवार चांगल्या मतांनी जिंकेल."

Minister Bungalow Live : राज्यातील मंत्र्यांच्या ३६ बंगल्यांचे वीज आणि पाणी बिल ५२ कोटी

राज्यातील मंत्र्यांच्या ३६ बंगल्याचे वीज आणि पाणी बिल ५२ कोटी आले आहे. हे बिल कंत्राटदारांना भरण्यासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे यावरून प्रश्न विचारले जात आहेत.

Union Minister Ramdas Athawale Live: इंडिया आघाडीला लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देण्याचा पूर्ण हक्क- रामदास आठवले

देशात लोकशाही आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण, भाजपकडे जास्त मतं आहेत. त्यामुळे एनडीएचाच उमेदवार विजयी होईल, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.

Pune Police in Action Live: पुण्यात अनधिकृत बार, पबवर कारवाईला सुरुवात

ड्रग्ज प्रकरण तापलं असल्याने पुण्यातील पोलीस अॅक्सन मोडमध्ये गेल्याचं दिसत आहे. पुण्यातील अनधिकृत बार आणि पबवर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

Sanjay Shirsat Live: मविआत बिघाडीत होऊ शकते, पण महायुतीत नाही- संजय शिरसाट

मविआघ बिघाडी होऊ शकते, पण महायुतीत बिघाडी होऊ शकत नाही. आघाडीमध्ये काँग्रेस मोठा पक्ष आहे. त्यांच्यामागे सर्वांना जावं लागेल. यामुळे आघाडीत बिघाडी होईल, असं शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले आहेत.

Loan Notice Live: कर्ज वसुलीसाठी मराठा निगमतर्फे नोटीस

मराठा विकास निगमतर्फे कर्ज वसुलीसाठी नोटीस जारी करण्यात येत आहे. काहींना या संदर्भात नोटीस बजाविण्यात आली आहे, तर काहींना नोटीस बजाविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Raosaheb Patil : सहकारमहर्षी रावसाहेब पाटील यांचे निधन

निपाणी : सहकारमहर्षी रावसाहेब पाटील (दादा) बोरगाव यांचं आज निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. बेळगावात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सीमाभागातील सहकार क्षेत्राच्या विस्तारात त्यांचं मोठं योगदान होतं. या शिवाय, अरिहंत उद्योग समूहाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. तसेच राष्ट्रवादीचे नेते उत्तम पाटील यांचे ते वडील होते.

Rajnath Singh spoke to Congress President Mallikarjun Kharge: सभापती निवड बिनविरोध करण्यासाठी राजनाथ सिंह यांचा मल्लिकार्जुन खर्गेंना फोन

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा करून सभापती निवड बिनविरोध करण्याचे आवाहन केले. बिनविरोध निवडून येण्याची परंपरा कायम ठेवली पाहिजे, असे राजनाथ सिंह म्हणाले. अद्याप नाव उघड करण्यात आलेले नाही. नाव समोर आल्यानंतर खर्गे उर्वरित INDIA Alliance पक्षांशी बोलतील. सभापतींची बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता : काँग्रेसची सूत्रे

Delhi Live Updates : दिल्लीतील प्रेम नगर परिसरातील घराला लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू

Delhi: दिल्लीतील प्रेम नगर परिसरात एका घराला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही आग लागली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. घरातील चार जणांचा धुरामुळे श्वास घेता येत नव्हता, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Sharad Pawar Live Updates : शरद पवार करणार महाराष्ट्र दौरा

लोकसभेच्या अधिवेशनानंतर शरद पवार महाराष्ट्र दौरा करणार आहेत. महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पोहोचण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न आहे.

Sharad Pawar Live Updates : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची आज महत्वाची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून आज मुंबई मधील विधानसभेचा आढावा घेण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरु आहे आणि गेल्या २०१९ च्या विधानसभेत पक्षाने मुंबईत ६ जागा लढवल्या होत्या.

Kolhapur Live Updates : रिक्षा चालकांचे सोळा तासांचे  बंद आंदोलन

आज मध्यरात्रीपासून कोल्हापुरात रिक्षा चालकांनी सोळा तासांचे रिक्षा बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात कोल्हापुरातील तब्बल 16000 रिक्षा चालक सहभागी होणार आहेत.

Arvind Kejriwal Live Updates : केजरीवाल यांना जेल की बेल? आज होणार फैसला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर आज दिल्ली उच्च न्यायालय देणार निर्णय आहे. दुपारी 2.30 वाजता कोर्ट निर्णय देणार आहे.

Delhi Water Minister Live Updates : दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांची ताब्बेत बिघडली

दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांची ताब्बेत बिघडली आहे. यावेळी त्यांना मध्यरात्री रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. राजधानी दिल्लीतील पाणी प्रश्नावर आतिशी यांनी २१ जून पासून उपोषण सुरु केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com